‘या’ कंपनीचा स्मार्टफोन अवघ्या 549 रुपयांत खरेदी करण्याची संधी

Smartphone | इनफिनिक्सने रिलायन्स जिओसोबत भागीदारी केली आहे. त्या माध्यमातूनही ग्राहकांना मोठी डिस्काऊंट मिळू शकते. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असणाऱ्या Infinix Smart 5A स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये इतकी आहे.

'या' कंपनीचा स्मार्टफोन अवघ्या 549 रुपयांत खरेदी करण्याची संधी
Infinix Smart 5A स्मार्टफोन

मुंबई: भारतीय बाजारपेठेत काही दिवसांपूर्वीच Infinix Smart 5A हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन आता स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी चालून आली आहे. कारण, सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart या संकेतस्थळावर या स्मार्टफोनचा सेल सुरु होईल.

हा फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. सेल अंतर्गत जिओ ऑफर देखील मिळेल. इनफिनिक्सने रिलायन्स जिओसोबत भागीदारी केली आहे. त्या माध्यमातूनही ग्राहकांना मोठी डिस्काऊंट मिळू शकते. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असणाऱ्या Infinix Smart 5A स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये इतकी आहे. मिडनाईट ब्लॅक, ओशियन वेव, क्युटजल क्यान या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

जिओच्या ग्राहकांसाठी खास ऑफर

Infinix कंपनीने या स्मार्टफोनसाठी जिओसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना Infinix Smart 5A स्मार्टफोनच्या खरेदीवर 550 रुपयांची कॅशबॅक मिळेल. याशिवाय, ग्राहकांना 1,199 रुपयांचा अतिरिक्त फायदाही मिळेल.

Axis आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल. स्टँटर्ड ईएमआयनुसार तुम्हाला या फोनसाठी महिन्याला 226 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. याशिवाय, तुमचा जुना फोन एक्स्चेंज केल्यास खरेदीत 5,950 रुपयांची सूट मिळेल. एक्स्चेंज ऑफरचा वापर केल्यास ग्राहकांना हा स्मार्टफोन 549 रुपयांता मिळेल.

काय आहेत या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये?

Infinix Smart 5A हा फोन XOS 7.6 वर आधारित अँड्राइड 11 प्रणालीवर काम करतो. यामध्ये 6.52 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए20 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
चार्जिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा पाहिजे? Vi चे 150 रुपयांहून कमी किंमतीचे प्लॅन्स पाहा

Independence Day Sale : Mi 11X, Mi 11 Lite सह टॉप स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

PHOTO | भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI