Inflation | माणसाची सोडा. रुपयाची तरी काय किंमत राहिली..पानिपत झालंय पानिपत..इतकी वाढली महागाई

Inflation | महागाईचा मार छुपा असतो. वळ तर उमटत नाही पण लागतो जोरदार. चला तर 1000 रुपयांचं मूल्य गेल्या 20 वर्षांत किती घसरलं ते पाहुयात..

Inflation | माणसाची सोडा. रुपयाची तरी काय किंमत राहिली..पानिपत झालंय पानिपत..इतकी वाढली महागाई
रुपयाचं पानिपतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 2:42 PM

नवी दिल्ली : महागाईला (Inflation) अर्थशास्त्रात (Economics) छुपा कर (Hidden Tax) म्हणतात, तो उगीच नाही. कारण त्याचा मार तर जोरात लागतो. पण वळ तर उमटत नाही. महागाईचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे पैशांचे अवमूल्यन (Depreciation)..लोकांची खरेदी क्षमता हळूहळू कमी होत जाते. गेल्या 20 वर्षात 1000 रुपयांत पूर्वी काय खरेदी करता येत होते आणि आता काय खरेदी करता येते त्याचा आढावा घेऊयात..

गेल्या पाच वर्षात महागाई रेकॉर्डब्रेक वाढली आहे. एकाही क्षेत्रात स्वस्ताई राहिलेली नाही. प्रत्येक वस्तूवर GST लावण्याचा सपाटा लावल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील वस्तूही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्ती आता बचत तर सोडा खर्च भागवण्यासाठीच धडपडत आहे.

बिझनेस टुडेने केलेल्या पडताळणीनुसार, गेल्या 20 वर्षांत काही वस्तूंचे भाव 400 टक्क्यांनी वाढले आहेत .बिझनेस टुडेने तुलनेसाठी धान्य, दाळी, पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादने आणि अन्य काही वस्तूंच्या किंमतीचा आधार घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

उत्पादने, वस्तूच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याने लोकांची क्रयशक्ती कमालीची प्रभावित झाली आहे. पूर्वी ज्या वस्तूसाठी भारतीयांना कमी पैसे द्यावे लागत होते. त्याच वस्तूसाठी आता त्यांचा खिसा खाली होत आहे. पूर्वी किराणा ज्या रक्कमेत येत होता. त्याचा दुप्पट आता रक्कम लागत आहे.

साध्या तांदळाचे 2000-01 मध्ये 5.27 रुपये किलो भाव होता. तोच तांदुळ आता 27.55 रुपये किलोने विक्री होत आहे. त्यावेळी 1000 रुपयांत 190 किलो तांदूळ खरेदी करता येत होता. आता हा तेवढ्याच रुपयात केवळ 36 किलो तांदूळ करेदी करता येतो.

गव्हाच्या किंमती या 21 वर्षात 166 टक्के वाढल्या आहेत. तर ज्वारीच्या किंमतीत 420 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे 1000 रुपयांत मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ शकणारा गहु आता अगदी काही किलोतच उपलब्ध होईल.

चनाडाळ त्यावेळी 1400 रुपये क्विंटल होती. आता दाळीचा भाव 5090 रुपये क्विंटल झाला आहे. तर उडदाची डाळ 264 टक्के, मूग 253 टक्के तर मसूर डाळीच्या भावात 340 टक्क्यांची वाढ झाली आहे.

2002-03 मध्ये दिल्लीत पेट्रोलचा भाव 29.5 रुपये लिटर होता. आज पेट्रोल 98 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल 19 रुपये प्रति लिटर मिळत होते. आज डिझेलचा भाव 87.5 रुपये लिटर झाले आहे.

तर 2004-05 मध्ये मुंबईत प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 6000 रुपये मोजावे लागत होते. सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 48,000 रुपये मोजावे लागत आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.