AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dearness Allowance News | कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदवार्ता, इतका मिळेल महागाई भत्ता

Dearness Allowance| सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्याची प्रतिक्षा लवकरच फळाला येणार आहे.

Dearness Allowance News | कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदवार्ता, इतका मिळेल महागाई भत्ता
महागाई भत्याची गुड न्यूजImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 23, 2022 | 4:55 PM
Share

Dearness Allowance News | अनेक दिवसांपासूनची सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची मागणी लवकरच पूर्ण होऊ शकते. याविषयीची केंद्रीय बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्यासह पगार मिळेल आणि या महागाईत त्यांचा हात सैल होईल. 7 व्या वेतन आयोगाची (7th Pay Commission) शिफारस असताना कर्मचारी कमी वेतनावर काम करत आहेत. याविषयीची तक्रार कर्मचारी संघटनांनी सरकारच्या कानावर घातली आहे. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या (Salary increase) संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central employees) वेतनात वाढ केली जाणार आहे. महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढणार असल्याचे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. या आनंदवार्तेमुळे कर्मचाऱ्यांचा मूड एकदम चांगला आहे.

महागाई भत्यात 4 टक्के वाढ

मे महिन्यातील ग्राहक महागाईच्या (Inflation) आकडेवारीवर महागाई भत्याचे गणित अवलंबून असते. महागाई भत्ता ठरवताना हे सूत्र वापरण्यात येते. केंद्र सरकारमधील (Central Government) सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय जवळपास पक्का मानण्यात येतो. पण त्यासाठी थोडीशी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण की, जून महिन्यातील ग्राहक महागाईची आकडेवारी येणे बाकी आहे. ही आकडेवारी 31 जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर महागाई भत्त्यात एकूण किती वाढ होणार हे ठरवण्यात येईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाशी जोडलेला आहे. त्याआधारे महागाई भत्ता ठरवण्यात येतो.

भत्यात आणखी होऊ शकते वाढ

जर अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकांचा (Indian Consumer Price Indices) आकडा सतत वाढत गेला तर त्याचा परिणाम महागाई भत्यावरही दिसून येतो. त्यानुसार महागाई भत्ताही वाढवला जातो. पहिल्या सहामाहीत पाच महिन्यांची आकडेवारी जाहीर झाली आहे. जूनचे आकडे अद्यापही आलेले नाहीत. या आकड्यांमध्ये वाढ झाली तर महागाई भत्याचा आकडा ही वाढू शकतो.

तज्ज्ञांचा काय आहे दावा

जूनमध्ये ग्राहक मूल्य निर्देशांकांचा आकडा 130 वर पोहोचेल असा दावा तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मे महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकाचा आकडा 129 अंकांवर होता. त्यामुळे आगामी काळात महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार हे गृहीत धरण्यात येत आहे.

DA 38 टक्के

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ गृहित धरल्यास त्यांचा डीए 38 टक्के होईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो.

पगारात वाढ

7 व्या वेतन आयोगाअंतर्गत किमान मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास 38 टक्के दराने वार्षिक महागाई भत्त्यात एकूण 6840 रुपये वाढतील. म्हणजेच सध्याच्या महागाई भत्त्याच्या तुलनेत दरमहा 720 रुपये वाढणार आहेत. एकूण, 18000 रुपये मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षाला 8640 रुपये अधिक महागाई भत्ता मिळेल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.