आयटीआर भरण्याच्या मुदतवाढीनंतरही ‘हा’ भुर्दंड बसणारच; प्राप्तीकर खात्याच्या नियमानुसार व्याजाची टक्केवारी जाणून घ्या

जर करदात्याने आयटीआरच्या वाढीव कालावधीतही कर परतावा भरला तर दरमहा 1% दराने व्याज भरावे लागेल. व्याजाची गणना आयटीआरच्या मूळ देय तारखेपासून म्हणजेच 31 जुलै 2021 पासून लागू होईल. ही तारीख सर्वसाधारण करदात्यांसाठी आहे.

आयटीआर भरण्याच्या मुदतवाढीनंतरही ‘हा’ भुर्दंड बसणारच; प्राप्तीकर खात्याच्या नियमानुसार व्याजाची टक्केवारी जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 7:53 AM

नवी दिल्ली : आयकर रिटर्नची शेवटची तारीख वाढवूनही काही लोकांना व्याज भरावे लागणार आहे. ई-पोर्टलमध्ये येणारा त्रास लक्षात घेता सरकारने आयकर रिटर्न (ITR filing) शेवटची तारीख लोकांना वाढवली आहे. पण ही सवलत प्रत्येकासाठी नाही. काही लोक असेही आहेत ज्यांना आयटीआर भरताना दरमहा 1% दराने अतिरिक्त व्याज द्यावे लागते. ज्यांचा कर दायित्व 1 लाख रुपयांपेक्षा जास्त बाकी आहे, त्यांना हा नियम लागू होणार आहे. (Interest will have to be paid even after the extension of ITR payment; know the percentage of interest)

कर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली गेल्याच्या परिपत्रकात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यात नमूद केले आहे की कलम 234अ संदर्भात मुदतवाढ लागू होत नाही. या विभागाचा अर्थ असा आहे की जर करदात्याने आयटीआरच्या वाढीव कालावधीतही कर परतावा भरला तर दरमहा 1% दराने व्याज भरावे लागेल. व्याजाची गणना आयटीआरच्या मूळ देय तारखेपासून म्हणजेच 31 जुलै 2021 पासून लागू होईल. ही तारीख सर्वसाधारण करदात्यांसाठी आहे. 31 ऑक्टोबरची तारीख त्या करदात्यांसाठी आहे, ज्यांच्या खात्याचे ऑडिट करायचे आहे. ज्यांच्या कराची शिल्लक रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असेल, त्यांना 1 टक्क्याचा नियम लागू होणार आहे.

5 हजार दंडापासून सुटका

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा मोठा फायदा म्हणजे करदात्यांना उशिरा आयटीआर भरताना 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार नाही. आयटी कायद्याच्या कलम 234 एफ अंतर्गत निर्धारित तारखेनंतर आयटीआर दाखल केल्याने 5000 रुपयांचा दंड आकारला जातो. पण सरकारने या दंडापासून करदात्यांना दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांना आगाऊ कर भरावा लागतो आणि ज्यांचा आगाऊ कर मूल्यांकित कराच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा 1 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. कलम 234 बी अंतर्गत हा नियम 1 एप्रिलपासून लागू समजला जाईल.

किती व्याज भरावे लागेल?

आयटीआर भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ज्या करदात्यांना आगाऊ कर भरावा लागेल, त्यांना 2 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. कलम 234इ अंतर्गत 1 टक्के व्याज आणि कलम 234अ अंतर्गत 1 टक्के व्याज. आयटीआर भरण्याची मूळ तारीख 31 जुलै किंवा 31 ऑक्टोबर असू शकते. ज्या तारखेसाठी करदात्याकडून शुल्क आकारले जाईल, त्यानुसार व्याज भरावे लागेल. ज्या करदात्यांना आगाऊ कर भरावा लागत नाही, परंतु ज्यांचे स्व-मूल्यांकन कर दायित्व 1 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना 31 जुलै किंवा 31 ऑक्टोबर या तारखेपासून 1 टक्के दराने व्याज भरावे लागणार आहे. (Interest will have to be paid even after the extension of ITR payment; know the percentage of interest)

इतर बातम्या

आमदार आशुतोष काळे यांना कोरोना, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद स्वीकारताना झाली होती गर्दी, संसर्ग वाढणार ?

महामार्गाच्या कामावरून पुन्हा पत्रप्रपंच; आता नितीन गडकरींना पंकजा मुंडे लिहिणार पत्र

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.