AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Investment Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या योजनेत गुंतवणूक, मग तुम्ही कशाला मागे राहता

PM Investment Scheme : पोस्टाच्या या योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुंतवणूक केली आहे. या योजनेत सध्या सरकार वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज देते. या योजनेत तुम्ही खाते उघडले का?

PM Investment Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या योजनेत गुंतवणूक, मग तुम्ही कशाला मागे राहता
| Updated on: Feb 11, 2023 | 10:31 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असला तर पोस्ट ऑफिसची ही योजना खास आहे. ही योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ही गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक त्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु इच्छित असाल तर ही योजना तुम्हाला मालामाल करेल. जीवन विमा आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate-NSC) अशी ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. कमीत कमी रुपयात गुंतवणूक सुरु करता येते. एक हजार रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनांमध्ये बचतीसोबतच ग्राहकांना चक्रव्याढ व्याजाचा (Compound Interest) मोठा लाभ मिळतो. विशेष म्हणजे या बचत योजनांना सरकारचे अभय आहे. त्यामुळे अल्पबचत योजनांमधील गुंतवणूक ही संपूर्णता सुरक्षित असते.

या योजनेत तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुमचा पैसा एकदम सुरक्षित राहतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत (National Savings Certificate) गुंतवणूक फायद्याची ठरते. या योजनेत पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो.

या योजनेत अवघ्या 5 वर्षात 20 लाख रुपयांचा परतावा मिळवता येतो. रक्कम जास्त गुंतवल्यास गुंतवणुकदारांना करोडपती सुद्धा होता येते. पाच वर्षांत चक्रव्याढ व्याजाच्या बळावर हा करिष्मा करता येतो. गुंतवणुकीवर कर सवलतही मिळते. योजनेत कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्यासोबतच सुरक्षिततेची पूर्ण हमी मिळते.

या योजनेत सध्या सरकार वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज देत आहे. कम्पांऊड इंटरेस्टच्या मदतीने गुंतवणुकदाराची रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वी चांगलीच वाढते. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. गुंतवणुकदाराची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधी वाढविता येतो. 5 वर्षे या योजनेत आणखी गुंतवणूक करता येते.

या योजनेत गुंतवणुकदाराला कर सवलतही (Tax Benefit) मिळते. ग्राहकाने केलेल्या एकूण गुंतवणुकीवर सरकारकडून प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत वजावटीचा लाभ मिळतो. दीड लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेवर गुंतवणुक करता येते. व्याजातून ग्राहकाला होणारा फायदा करपात्र आहे. गुंतवणुकदार व्याज उत्पन्न परताव्यात जमा करू शकतो.

या योजनेतंर्गत 5 वर्षांत 20.58 लाख रुपये मिळवता येतात. त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. चक्रव्याढ व्याजाचा या रक्कमेवर फायदा मिळेल. 6.8 टक्के दराने तुम्हाला 6 लाख रुपयांचा फायदा मिळेल. त्यामुळे गुंतवणुकदाराला 20.58 लाख रुपये मिळतील. पाच वर्षांसाठी तुम्ही योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास व्याजाद्वारे 1,38,949 रुपये मिळतील. तर 2 लाखांच्या गुंतवणुकीवर व्याजासहीत 2,77,899 रुपये हाती येतील. 5 लाख गुंतवणुकीवर 6,94,746 रुपये मिळतील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.