Small Saving Scheme : खुशखबर! अल्पबचत योजना करतील मालामाल, केंद्र सरकारने वाढविले व्याज

Small Saving Scheme : केंद्र सरकारने अल्पबचत योजनेतील गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या योजनेतील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना तीन महिन्यात अधिक व्याज प्राप्त करता येईल.

Small Saving Scheme : खुशखबर! अल्पबचत योजना करतील मालामाल, केंद्र सरकारने वाढविले व्याज
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 6:36 PM

नवी दिल्ली : अल्पबचत योजनांमधील (Small Saving Schemes) गुंतवणूकदारांना केंद्र सरकारने आनंदवार्ता दिली आहे. या योजनांवरील व्याजदर वाढवला आहे. 1 एप्रिल, 2023 रोजीपासून हा नवीन व्याजदर लागू होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना बचतीवर अधिक कमाई करता येईल. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी, अल्पबचत योजनांच्या व्याज दरांमध्ये 70 bps (बेसिस पॉईंट) पर्यंत वाढ ( Interest Rates Hiked) करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरीक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र यासारख्या योजनांचे व्याजदर केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी वाढवले आहे.

पीपीएफवर नाही वाढ

उतारवयात मदतीला येणारी लोकप्रिय योजना, पब्लिक प्रोव्हिडंड फंडवरील PPF (Public Provident Fund) व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने या योजनेत कसलाच बदल केला नाही. ही सलग 12 वी तिमाही आहे, यामध्ये व्याजदर वाढविण्यात आला नाही. सध्या या योजनेत केंद्र सरकार 7.1% व्याजदराने परतावा देते.

हे सुद्धा वाचा

व्याजदर कसा होता निश्चित

केंद्र सरकार अल्पबचत योजनांवरील व्याजदरात दर तीन महिन्यांनी बदलाव करते. व्याजदर किती असावा, याचे एक गणित आहे. सरकारी बाँड्समध्ये किती लाभ होईल, या आधारे या अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमीअधिक होते. श्यामला गोपीनाथ कमिटीने शिफारस केली आहे. त्यानुसार बाँड यील्ड पेक्षा व्याजदर 25 ते 100 बीपीएस जास्त असावा. केंद्र सरकारने यापूर्वी डिसेंबरच्या तिमाहीत अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली होती. त्यावेळी पब्लिक प्रोव्हिडेंट फंड आणि सुकन्या समृ्द्धी योजनेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली नव्हती.

व्याजदर वाढीसाठी दबाव

बाजारात सध्याची परिस्थिती पाहता व्याजदर वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि किसान विकास पत्र (KVP) तसेच पोस्ट ऑफिससंबंधीच्या बचत योजनांवरील सध्याच्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या सुरुवातीला काही बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती. तर काही योजनांवरील व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले. ईपीएफओने व्याजदरात किंचित का असेना वाढ केली आहे.

कोणत्या योजनांवर किती वाढवले व्याज

  1. ज्येष्ठ नागरीक बचत योजनेवर व्याज दर 8% हून वाढवून 8.2 % करण्यात आला.
  2. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) वर व्याजदर 7 हून 7.7 टक्के करण्यात आला.
  3. सुकन्या समृद्धी योजनेवर व्याजदर 7.6 टक्क्यांहून वाढवून 8 टक्के करण्यात आला.
  4. किसान विकास पत्रावर व्याजदर 7.2 (120 महिने) हून वाढवून 7.5 (115 महिने) करण्यात आला.

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.