Opportunity | तरुणाई याच्या प्रेमात वेडीपिसी.. तोट्याचं सोडा.. गणित तर फायद्याचं आहे बुवा..

Opportunity | आता तुम्ही म्हणाल तरुणाई आता कोणाच्या प्रेमात वेडीपिसी झाली आहे. तर हा वेडेपणा तरुणाईला शहाणा करुन सोडणारा आहे..

Opportunity | तरुणाई याच्या प्रेमात वेडीपिसी.. तोट्याचं सोडा.. गणित तर फायद्याचं आहे बुवा..
तरुणाईचे नवे क्रश
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Sep 22, 2022 | 12:46 PM

मुंबई : कोविड- 19 ने (Covid 19) जगाचं तंत्रच बदलून टाकलं आहे. नाही का? सर्व परिमाणं, समजूती पार मोडीत काढल्या आहेत. आता गुंतवणुकीचंच (Investment) बघा ना.. तरुणाईचा गुंतवणुकीतील टक्का कमी होता. त्यात शेअर बाजार (Share Market) म्हटलं की त्यांना नको ती झंझट असे वाटत होते. पण, आता हे चित्र पालटलं आहे..

कोरोना सारख्या जागतिक महामारीमुळे शेअर बाजारातही बदल झाला. लॅपटॉपवर स्थिरावलेला बाजार झटक्यात मोबाईलवर आला आणि क्रांती झाली. किचकट पद्धत बदलली. झटपट शेअर खरेदी, सोपी विक्री. त्यातच अनेक अॅप्स विकसीत झाली नी शेअर बाजाराचा चेहरामोहरा बदलला.

तरुणाई हळूच शेअर बाजारात डोकाऊन पाहु लागली. हा जुगार नाही तर अभ्यासून गुंतवणुकीचा महत्वाचा टप्पा असल्याचे त्यांना उमगले. आता तर सोशल मीडियापेक्षा अनेक तरुणांनी या ट्रेडिंग अॅप्सवर तंबू ठोकले आहेत.

कोणता शेअर किती वर गेला. का गेला. किती दिवस वर राहिला. त्याची प्रिन्सिपल्स काय. कंपनीचे फंडामेंटल्स काय. गुंतवणूक किती, उत्पादन काय, विक्रीचा आकडा किती. या कंपनीवर कर्ज किती असा सगळा धांडोळा ही नवी पिढी घेत आहे.

मोतीलाल ओसवाल फाइनेन्शिअल सर्विसेचे चेयरमेन रामदेव अग्रवाल यांनी शेअर बाजारात देशातील तरुणांनी अशात मोठ्या प्रमाणात डी-मॅट खाती उघडल्याचे सांगितले. शेअर बाजारात प्रचंड उलाढाली सुरु आहेत. विदेशी गुंतवणूकदारांच जणू मार्केट नियंत्रीत करत असल्याचे चित्र आहे. पण तरुणाई तसू भरही मागे हटली नाही.

आयपीओ बाजारातही उलाढाल होत आहे. अनेक कंपन्या बाजारात आयपीओ घेऊन येत आहेत. तरुणाई आयपीओत रक्कम गुंतवणूक करत आहे. आयपीओचे तंत्र समजून घेत आहे. काही शेअर प्रचंड महाग असल्याने त्यांना शेअर बाजारात शेअरही खरेदी करता येत नाही.

दुसरीकडे जास्त जोखीम न घेणारे तरूण म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत. त्यांची गुंतवणूक वाढली आहे. परंपरागत मार्गापेक्षा तरुणाईने शेअर बाजार, आयपीओ आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या महागाईचा दर 7% आहे. त्यामुळे परंपरागत गुंतवणूक योजना मुदत ठेव, आवर्ती ठेव यातील गुंतवणुकीपेक्षा तरुणाई इतर पर्यांयाकडे वळली आहे. याठिकाणी त्यांची गुंतवणूक वाढली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें