Lottery : याला म्हणत्यात नशिब ! अवघ्या दीड तासात फासे पलटले, केरळचा मच्छिमार दिवसाच झाला सुपरस्टार..

Lottery : नशिबाच्या आले मना..तिथे राजाचे नी रंकाचेही चालेना..

Lottery : याला म्हणत्यात नशिब ! अवघ्या दीड तासात फासे पलटले, केरळचा मच्छिमार दिवसाच झाला सुपरस्टार..
अन् नशीब पालटलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 3:04 PM

कोल्लम, केरळ : नशिबाच्या (Fortune) सोंगट्या एखाद्यावेळी असा फासा पलटवतात की तोंडात बोट गेल्याशिवाय राहत नाही. नशीब, नशीब म्हणतात ते काय असते असा सर्वांनाच प्रश्न पडतो. पण ज्यावेळी अंधारात कुढत असलेल्या जीवांना चमत्काराचा परिणाम पहायला मिळतो, तेव्हा नशीब पालटते, नशीब चमकते, ते चकाकते.

तर आपल्या बातमीचा नायक आहे केरळमधील (Kerala) एक मच्छिमार (Fisherman) . त्याच्या नशिबाने अचानक अशी कूस बदलली की त्याला चमत्काराशिवाय दुसरा शब्द नाही. अवघ्या दीड तासात या पठ्ठ्याच्या नशिबाने फासे पलटवले आणि दुःखाला हास्याची किनार लाभली.

कोल्लम येथील 40 वर्षीय पुकुंजू (Pookunju) यांच्या जीवनात 12 ऑक्टोबर रोजी प्रचंड दुःखाची आणि नंतर आनंदही गगनात मावणारी नाही अशा दोन घटना लागोपाठ घडल्या. त्यामुळे ते आनंदविभोर झाले.

हे सुद्धा वाचा

पुकुंजू हे मच्छिमार आहेत. त्यांनी कॉर्पोरेशन बँकेकडून (Corporation Bank) गृहकर्ज घेतले होते. त्याच्या हप्त्याची परतफेड करताना त्यांची ओढताण झाली. 7.45 लाखांचे कर्ज त्यांनी घेतले होते. परतफेड न झाल्याने त्यांच्यावर व्याजासहित 12 लाख रुपयांची थकबाकी होती.

त्यातच बँकेने त्यांची मालमत्ता म्हणजे घराच्या जप्तीची प्रक्रिया सुरु केली होती. त्यामुळे ते अक्षरशः मेटाकुटीला आले होते. काय करावे हे त्यांना सूचत नव्हते. 12 ऑक्टोबर रोजी तर कहरच झाला. मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची नोटीस त्यांना बँकेने पाठविली. दुपारी 2 वाजता त्यांना बँकेची नोटीस मिळाली.

डोक्यावरचं छप्परच हिरावल्या जात असल्याने ते खचून गेले. आता नशिबाने आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, याच विचारात ते होते. नशिबाने त्यांची फारशी परिक्षा घेतले नाही. पुढील अवघ्या दीड तासात त्यांचे नशीब एकदम पालटले..

12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजता त्यांना भावाचा कॉल आला. पुकुंजू यांच्या डोळ्यातून घळा घळा आनंदाश्रू टपकले. नशिबाने त्यांच्या सर्व चिंता एका फटक्यात दूर केल्या. त्यांना तब्बल 70 लाख रुपयांची लॉटरी लागली.

अक्षय लॉटरी योजनेतून त्यांचे नशिब पालटले. युसूफ कुंजू हे पुकुंज यांचे वडील, त्यांना लॉटरीचे तिकीट घेण्याची सवय होती. त्यानंतर पुकुंजू यांनी लॉटरीचे तिकीट घेण्याची सवय लागली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.