घर भाड्यानं दिलं असेल तर करात सूट, काय नियम आहेत? कसा फायदा होणार?

भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना घरभाड्यावर करता सवलत दिली जाते. इतकंच नाही तर घर मालकांना देखील यासाठी करात सवलत मिळते.

घर भाड्यानं दिलं असेल तर करात सूट, काय नियम आहेत? कसा फायदा होणार?


नवी दिल्ली : कर परताव्यासाठी (टॅक्स रिफंड) अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. त्यामुळे आयकराच्या कोणत्या नियमानुसार करात सूट मिळते याबाबत अनेकजण शोधाशोध करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना घरभाड्यावर करता सवलत दिली जाते. इतकंच नाही तर घर मालकांना देखील यासाठी करात सवलत मिळते. ती कशी याबाबतच जाणून घेऊ (Know about how to get rebate from income tax for house rent landlord).

घर मालकांनाही करातून सूट?

आयकराच्या नियमांनुसार घरमालकांना घरभाड्यातून मिळणाऱ्या पैशांसाठी कर सवलत मिळते. असं असलं तरी ही सूट थेट दिली जात नाही. आयकर विभाग घर भाड्यातील उत्पन्नाला कमी मानतो. त्यानुसार भाड्यातून होणाऱ्या उत्पन्नात 30 टक्क्यांची सूट दिली जाते. उर्वरित 70 टक्के रकमेवर कर लावला जातो. आधी ही सूट मेटेंनन्स खर्च म्हणून दिली जायची, मात्र आता सरसकट 30 टक्के सूट दिली जाते.

उदा. तुमच्या एका फ्लॅटचं भाडं वार्षिक 6 लाख रुपये येतं. अशा परिस्थिती या 6 लाख रुपयांच्या पूर्ण रकमेला उत्पन्न मानलं जात नाही. यात 30 टक्के घट करुन उर्वरित रकमेवर कर लावला जातो. त्यानुसारच कराची आकारणी होते. दुसरीकडे तुम्ही जर कर्ज घेतल्यानंतर संपत्ती भाड्याने दिली तर त्यासाठी वेगळे नियम आहेत.

याशिवाय जे लोक व्यावसायिक पातळीवर घर भाडे दाखवतात त्यांच्यासाठी भाडं म्हणजे निव्वळ उत्पन्न मानून व्यावसायिक नियम लागू होतात. त्यांच्यासाठी कराची वेगळी व्यवस्था आहे. जर कुणी आपली संपत्ती विकली तर त्याला कॅपिटल गेन्सनुसार अॅडजस्ट केलं जातं. याला पुढील 8 वर्षांपर्यंत सेट ऑफ केलं जातं.

भाडं नाही तर करही नाही

आधी घरमालकांना संपूर्ण वर्षासाठी भाडं मिळालेलं असो अथवा नसो कर द्यावा लागत असे. मात्र, आता घरमालकांना भाडं मिळालं नसेल तर कर द्यावा लागणार नाही. म्हणजे जर केवळ 8 महिनेच भाडं मिळालं तर त्याच रकमेवर कर द्यावा लागेल. त्या स्थितीत संपूर्ण 12 महिन्यांचा कर आकारला जाणार नाही.

हेही वाचा :

नव्याने नोकरी करत असाल तर ITR फायलिंगबाबत या 5 गोष्टी समजून घ्या, कर्जापासून विजा मिळण्यासही मदत

Income Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

व्हिडीओ पाहा :

Know about how to get rebate from income tax for house rent landlord

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI