स्वस्त पेट्रोलसाठी Axis Bank कडून ‘हे’ स्पेशल कार्ड, जबरदस्त कॅशबॅक मिळणार!

इंधनावरील खर्च कमी करण्याचे मार्ग शोधत असलेल्या लोकांसाठी अॅक्सिस बँक चांगली ऑफर घेऊन आलीय.

स्वस्त पेट्रोलसाठी Axis Bank कडून 'हे' स्पेशल कार्ड, जबरदस्त कॅशबॅक मिळणार!
Axis Bank changes
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 4:40 PM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. यामुळे अनेकांचं आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे असे सर्वजण आपला इंधनावरील खर्च कमी करण्याचे मार्ग शोधत आहेत. अशा लोकांसाठी अॅक्सिस बँक चांगली ऑफर घेऊन आलीय.अॅक्सिस बँक इंडियन ऑईल क्रेडिट कार्ड नावाचं एक स्पेशल कार्ड बँक घेऊन येतेय. पेट्रोलचं पेमेंट करताना याचा उपयोग केल्यास ग्राहकांना जबरदस्त कॅशबॅकची ऑफर देण्यात आलीय. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत याचे नियम आणि किती फायदा होणार (Know all about benefits of Axis Bank Indian Oil Credit Card).

काय आहे हे कार्ड?

अॅक्सिस बँकेने इंडियन ऑईलसोबत भागिदारी करत Axis Bank Credit Card लाँच केलंय. याचा उद्देश इंधनाच्या पेमेंटवर ग्राहकांना कॅशबॅक ऑफर देत ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देणं हा आहे. विशेष म्हणजे प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅकसोबतच अनेक रिवॉर्ड पॉईंट देखील मिळणार आहे. या कार्डचा वापर इंधनासोबतच इतर शॉपिंगसाठी देखील करता येणार आहे. केवळ इंधन व्यवहारासाठी या कार्डवर अधिक डिस्काऊंट मिळेल.

काय फायदा होणार?

या कार्डचा उपयोग केल्यास तुम्हाला 30 दिवसात पेट्रोल-डिझेलवर 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकची मर्यादा 250 रुपये असेल. याशिवाय प्रत्येक पेमेंटवर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट मिळतील. याचा उपयोग नंतर शॉपिंगसाठी करता येईल. सोबतच या कार्डमुळे 1 टक्के Fuel surcharge waiver चाही फायदा घेता येईल. इतर शॉपिंगमध्येही यामुळे सूट मिळेल. इतर अनेक ठिकाणी देखील या कार्डचा वापर केल्यास इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

कार्डचे चार्जेस किती?

हे कार्ड मिळवण्यासाठी सुरुवातीला जॉइनिंग फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. त्यानंतर दरवर्षी वार्षिक फीच्या रुपात 500 रुपये चार्जेस पडतील. विशेष म्हणजे तुम्ही वर्षभरात या कार्डवरुन 50 हजार रुपयांपर्यंत खर्च केल्यास तुम्हाला वार्षिक फी द्यावी लागणार नाही.

कार्ड कसं मिळवाल?

हे कार्ड मिळवण्यासाठी अॅक्सिस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. यात पॅन कार्ड किंवा फॉर्म 60, कलर फोटो, लेटेस्ट पे स्लिप किंवा आयकर रिटर्न, पत्ता, आईडी प्रुफ इत्यादी कागदपत्रे द्यावे लागतील. तुमच्या उत्पन्नाप्रमाणे तुम्हाला ठराविक रकमेच्या व्यवहारांची मर्यादा असलेलं कार्ड दिलं जाईल.

हेही वाचा :

अॅक्सिस बँकेच्या खातेधारकांना 1 मेपासून झटका, बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ होणार

कॅशियर म्हणून जॉईन व्हा, VP च्या पोस्टपर्यंत पोहोचू शकता, अट एकच, नेटकऱ्याची कमेंट, अमृता फडणवीस भडकल्या

अ‍ॅक्सिस बँकेत चार कोटींची चोरी, पोलिसांची पळापळ, सीसीटीव्हीत बघितलं तर कुंपणच शेत खात असल्याचं उघड

व्हिडीओ पाहा :

Know all about benefits of Axis Bank Indian Oil Credit Card

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.