सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचेय, मग या गोष्टींची काळजी घ्या

Gold Loan | सध्या बँकांशिवाय इतर काही संस्थाही सोने तारण ठेवून कर्ज देतात. एसबीआय गोल्ड आणि मुथूट फायनान्स सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या आघाडीच्या संस्था आहेत. मात्र, सोने तारण कर्जावरील व्याजही जास्त असते.

सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचेय, मग या गोष्टींची काळजी घ्या
सोने तारण कर्ज
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 11:09 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. नोकरी नसल्यामुळे अनेकांना दैनंदिन खर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. बँकांच्या अटी-शर्तींमुळे सामान्य लोकांना पटकन कर्ज मिळत नाही. त्यामुळे अनेकजण घरातील सोने गहाण (Gold loans) ठेऊन पैसे कर्जाऊ घेत आहेत.

सध्या बँकांशिवाय इतर काही संस्थाही सोने तारण ठेवून कर्ज देतात. एसबीआय गोल्ड आणि मुथूट फायनान्स सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या आघाडीच्या संस्था आहेत. मात्र, सोने तारण कर्जावरील व्याजही जास्त असते. त्यामुळे ग्राहक कायम कमी व्याजदर आकारणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतात.

सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचे फायदे

अडीअडचणीच्या प्रसंगात घरात सोने असल्यास ते गहाण ठेवून कर्ज घेणे हा खूप मोठा आधार ठरू शकतो. तुम्हाला तातडीने पैसे हवे असल्यास सोने तारण कर्जासारखा पर्याय नाही. हे कर्ज मिळवण्यासाठी इतर कर्जांच्या तुलनेत कमी प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याच्या शुद्धतेवर आणि बाजार मूल्यानुसार कर्जाची रक्कम ठरते. सोन्याचे दागिने 18 कॅरेटपेक्षा जास्तीचे असतील तरच त्यावर कर्ज मिळते. हे कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नसते. तसेच कर्जाच्या पैशांचा वापर कशासाठी करणार, हे सांगणेही बंधनकारक नसते.

सोने तारण ठेवून कर्ज घेताना काय काळजी घ्याल?

सोने तारण ठेवून कर्ज घेताना संबंधित बँक आणि वित्तीय संस्थेकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजदाराची माहिती घ्यावी. बँक कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस आकारत नाही ना, याची खातरजमा करुन घ्यावी. याशिवाय, प्री-पेमेंट, प्रोसेसिंग फी, री-पेमेंट चार्ज हा सगळा तपशील तपासून घ्यावा.

किती कर्ज मिळते?

तुम्ही सोन्यावर 10 हजारापासून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊ शकता. पण तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांवर किती कर्ज द्यायचे याचे नियम प्रत्येक बँकेत वेगवेगळे असतात. सोन्याच्या एकूण किंमतीच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. 22 कॅरेट सोन्याचा किंमत ही आधारभूत किंमत असते. तुमच्याकडे कमी कॅरेटचे सोने असेल तर कर्जही कमी मिळेल. तुम्ही एक लाखांचे सोने गहाण ठेवले तर तुम्हाला 75 हजारांचे कर्ज मिळेल. एसबीआयकडून 20 हजारापासून 20 लाखांपर्यंत सोने तारण कर्ज दिले जाते. मुथुट फायनान्सकडून किमान 1500 रुपयांपासून कोणत्याही रक्कमेचे कर्ज दिले जाते.

सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. त्याठिकाणी तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर काही कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तुम्हाला सोने दिले जाते. सोन्याच्या किंमतीनुसार तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.

संबंधित बातम्या:

चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत

Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.