मुंबई : सध्याचं युग डिजीटल युग आहे. त्यामुळे आता अनेक गोष्टी हाताच्या बोटावर आल्या आहेत. जेवणापासून बँकेच्या व्यवहारापर्यंत अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या हातातील मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन करु शकता. मात्र, हे सर्व करताना तुमचे व्यवहार सुरक्षित राहावेत म्हणून डिजीटल सुरक्षेसाठी आवश्यक पासवर्डही लागतात. मात्र, आता इतक्या ठिकाणी पासवर्ड, पिन किंवा कोड टाकावे लागतात की कुठे कोणता पासवर्ड टाकला हेही अनेकदा लक्षात राहात नाही. त्यातच लक्षात राहावा असा एखादा सोपा पासवर्ड टाकला तर त्यामुळे धोकाही असतो. त्यामुळे तुम्हालाही तुमचा पासवर्ड आणि डेटा चोरी जाण्याची भीती वाटत असेल तर चला पाहुयात पासवर्ड सुरक्षेसाठीच्या काही खास टीप्स (Know important tips to keep your password safe do this to make it strong).