तुम्ही फोन नंबर बदललाय? जुन्या नंबरवरील तुमची पर्सनल माहिती होऊ शकते लीक, सावध कसे राहाल?

प्रिन्सटन विद्यापीठाच्या (Princeton University) नव्या संशोधनानुसार नंबर रिसायकलिंगची प्रक्रिया युजरची गोपनीयता आणि सुरक्षितता पणाला लावते (Old Mobile Phone number)

तुम्ही फोन नंबर बदललाय? जुन्या नंबरवरील तुमची पर्सनल माहिती होऊ शकते लीक, सावध कसे राहाल?
Old Mobile Phone number
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 1:05 PM

मुंबई : फोन नंबर बदलल्यानंतर जुन्या नंबरचं (Old Mobile Number) नेमकं काय होतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? मोबाईल कॅरिअर्स तुमचा जुना नंबर रिसायकल करुन नवीन युजरला देतात. नंबर एक्झॉशन (number exhaustion) म्हणजेच क्रमांक संपण्याची क्रिया टाळण्यासाठी टेलिकॉम कंपनीज (Telecom Company) ही पद्धत अवलंबतात. मात्र तो नंबर वापरलेल्या जुन्या युजर्ससाठी ही प्रक्रिया सुरक्षित नाही. कारण जुन्या नंबरशी निगडित डेटा नवीन युजरला उपलब्ध (अॅक्सेसिबल) होतो. त्यामुळे तुमची गोपनीयता आणि सुरक्षितताच धोक्यात येते. (Old Mobile Phone number can be used to gain access to your Private Security Information)

प्रिन्सटन विद्यापीठाच्या (Princeton University) नव्या संशोधनानुसार नंबर रिसायकलिंगची प्रक्रिया युजरची गोपनीयता आणि सुरक्षितता पणाला लावते. रिसायकल नंबरमुळे नव्या युजर्सना जुन्या युजर्सच्या नंबरशी निगडित माहिती उपलब्ध होते. नंबर बदलल्यानंतर तुम्ही आपल्या सर्व डिजिटल अकाऊण्टमध्ये नवा नंबर अपडेट करण्यास विसरलात, तर तुमची पर्सनल माहिती लीक झालीच समजा.

प्रिन्सटन विद्यापीठाचे संशोधन काय?

प्रिन्सटन विद्यापीठाच्या नव्या संशोधनानुसार एका पत्रकाराने नवीन नंबर घेतला. मात्र त्याला ब्लड टेस्ट, स्पा अपॉइंटमेंटविषयी मेसेजेस येत होते. याविषयी माहिती मिळाल्यानंतर प्रिन्सटन विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने 200 रिसायकल नंबर एका आठवड्यासाठी पडताळले. त्यापैकी 19 म्हणजे जवळपास दहा टक्के नंबरवर गोपनीय किंवा सिक्युरिटीशी निगडीत कॉल-मेसेज येत असल्याचे त्यांना समजले. (जसे की ऑथेंटिकेशन पासकोड, रिमाईंडर) रिसायकल नंबर अनाहूतपणे मिळालेल्या नव्या युजर्सना अशी संवेदनशील माहिती उपलब्ध करुन देतो. त्यामुळे गैरफायदा घेण्याची आयती संधी त्यांच्याकडे चालून येते, असं या अहवालाविषयी संशोधक अरविंद नारायण यांनी सांगितलं.

नंबर रिसायकलिंगमुळे जुन्या युजरसाठी पाच धोके कोणते?

1. फिशिंग अटॅक 2. नंबर अपडेट न केलेल्या डिजिटल अकाऊण्टचे पासवर्ड रिसेट करणे शक्य 3. नंबर अपडेट न केलेल्या डिजिटल अकाऊण्टवरुन ओटीपी मिळवणे शक्य (बँक खात्याचाही समावेश असू शकतो) 4. तुमच्या जुन्या नंबरवर कोणी स्वतःहून व्हॉट्सअॅप मेसेज केल्यास त्याची चॅटिंगद्वारे फसवणूक शक्य 5. न्यूजलेटर, कॅम्पेन यांना सबस्क्राईब करण्याची शक्यता

(Old Mobile Phone number)

सावध कसे राहाल?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोन नंबर बदलल्यानंतर आधीच्या नंबरशी  निगडित सर्व डिजिटल अकाऊण्टमध्ये आपला नवीन क्रमांक अपडेट करुन घ्या.

1. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, जीमेल यासारखी सोशल मीडिया अकाऊण्ट 2. आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अशी महत्त्वाची कागदपत्रं 3. आर्थिक व्यवहार – सर्व बँक खाती 4. लाईट बिल, गॅस बिल आणि अन्य अलर्ट पाठवणाऱ्या यंत्रणा 5. झोमॅटो, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स अशी मनोरंजन, ई कॉमर्स, फूड डिलिव्हरी अॅप्स

संबंधित बातम्या :

भारतातील 5G नेटवर्क टेस्टिंगवर बंदी घाला, सुप्रीम कोर्टात याचिका

भारतात 5G Network साठी टेस्टिंग, स्मार्टफोन युजर्सना लवकरच मिळणार सर्व्हिस

(Old Mobile Phone number can be used to gain access to your Private Security Information)

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.