भारतातील 5G नेटवर्क टेस्टिंगवर बंदी घाला, सुप्रीम कोर्टात याचिका

भारतात 5G इंटरनेट (5G Internet) टॉवरच्या चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

भारतातील 5G नेटवर्क टेस्टिंगवर बंदी घाला, सुप्रीम कोर्टात याचिका
5g Technology
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 12:05 AM

नवी दिल्ली : भारतात 5G इंटरनेट (5G Internet) टॉवरच्या चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विधीज्ञ ए. पी. सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, आज भारतासह जगभरात 5G नेटवर्कला विरोध केला जात आहे. 5G नेटवर्क हा पृथ्वीसाठी एक मोठा धोका आहे, परंतु मोबाइल कंपन्यांनी 5G स्मार्टफोनची विक्रीदेखील सुरू केली आहे. (Petition filed in supreme court to ban on 5G Network testing in India)

इंटरनेट युजर्सच्या गोपनीयतेसाठी 5 जी सर्वात मोठा धोका असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. यामुळे युजर्सचा डेटादेखील सहज हॅक होऊ शकतो. दरम्यान याचिकाकर्त्याने याचिकेमध्ये असेही नमूद केले आहे की, नेदरलँड्स येथे 5G नेटवर्कच्या चाचणी दरम्यान शेकडो पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाला. हेग शहरातील 5 जी नेटवर्कच्या चाचणीदरम्यान सुमारे 300 पक्ष्यांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी 150 पक्ष्यांचा चाचणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाला होता.

देशाच्या सुरक्षिततेला धोका?

याचिकेत म्हटले आहे की, 2018 मध्ये हरियाणाच्या गुरुग्राममध्ये चीनी कंपनी हुवावेने 5 जी इंटरनेटची चाचणी केली होती. यात असे म्हटले आहे की, 5 जी नेटवर्कच्या तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर केला जातो, यामुळे कर्करोगाचा धोकादेखील मोठ्या प्रमाणात वाढतो. गर्भधारणेदरम्यान मोबाइल रेडिएशनचा स्त्रिया तसेच मुलांवरही परिणाम होतो. 5 जी नेटवर्क दहशतवाद्यांसाठी उपयुक्त ठरेल आणि देशाच्या सुरक्षेलाही मोठा धोका असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

जिओकडून स्पेक्ट्रमची खरेदी

गेल्या काही काळापासून सर्वच दूरसंचार कंपन्या 5 जी नेटवर्कच्या चाचणीवर जोर देत आहेत. एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया सतत त्याच्या चाचणीवर काम करत आहेत. जिओने अलीकडे 57 हजार 123 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केलं आहे. यासह कंपनीने 22 सर्कल्समध्ये स्पेक्ट्रमची खरेदी केली आहे. रिलायन्स जिओने खरेदी केलेला स्पेक्ट्रम 5 जी सेवा देण्यासाठी देखील वापरला जाईल. कंपनीने अलीकडेच जाहीर केले आहे की, त्यांनी स्वदेशी 5 जी तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याची चाचणी अमेरिकेत झाली आहे. यासह कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनीही यंदा 5G लाँच करण्याची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या

भारतात 5G Network साठी टेस्टिंग, स्मार्टफोन युजर्सना लवकरच मिळणार सर्व्हिस

तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

(Petition filed in supreme court to ban on 5G Network testing in India)

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.