AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GOLD PRICE TODAY: 50 हजारांचा टप्पा पार, मुंबई ते नागपूर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे भाव

राजधानी मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46300 व 24 कॅरेट सोन्याला 50510 रुपये भाव मिळाला. सोन्यानं पन्नास हजारांचा टप्पा पार केल्याने सोने गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

GOLD PRICE TODAY: 50 हजारांचा टप्पा पार, मुंबई ते नागपूर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे भाव
काय आहेत आजचे सोन्याचे दर?
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 5:26 PM
Share

मुंबई : आजवरचा सर्वाधिक मोठ्या बँकिंग घोटाळ्याचे पडसाद शेअर मार्केटप्रमाणे सोने बाजारावर उमटले. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बलाढ्य गुंतवणुकदारांनी आपला मोर्चा सोने खरेदीकडे वळविला. महाराष्ट्रात सोन्यासह चांदीच्या भावात मोठी भाववाढ दिसून आली. मल्टि कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज (सोमवारी) सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) तेजी दिसून आली. सोन्याप्रमाणेचं चांदीला(Silver price today) झळाळी मिळाली. महाराष्ट्रातील काही शहरांत सोन्याच्या भावाने पन्नास हजारांचा टप्पा पार केला. MCX वर सोन्याची 0.87 टक्क्यांच्या तेजीसह घौडदोड सुरू आहे. चांदीचा भावही प्रति किलो 64 हजार रुपये किलो वर जाऊन पोहोचला आहे. एप्रिल डिलिव्हरी सोन्याची किंमत प्रति तोळा 50 हजारांच्या नजीक जाऊन पोहोचली आहे. चांदीची 1.29 टक्क्यांच्या वाढीसह प्रति किलो 64,799 रुपये ट्रेडिंग सुरू आहे.

राजधानी मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46300 व 24 कॅरेट सोन्याला 50510 रुपये भाव मिळाला. सोन्यानं पन्नास हजारांचा टप्पा पार केल्याने सोने गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :

• मुंबई- 50,510 रुपये

• पुणे- 50,450 रुपये

• नागपूर- 50,510 रुपये

• नाशिक- 50,450 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):

• मुंबई- 46,300 रुपये

• पुणे- 46,250 रुपये

• नागपूर- 46,300 रुपये

• नाशिक- 46,250 रुपये

गुंतवणुकदारांचा मोर्चा ‘सोन्या’कडं?

शेअर बाजाराला मोठ्या पडछडीला सामोरे जावं लागलं आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेक जण सोन्याला पहिली पसंती देतात. शेअर बाजारातील अस्थिरता, आजवरच्या सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याचे पडसाद सोने बाजारावर दिसून येत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

LIC IPO : विमाधारकांसाठी खूषखबर; आयपीओसाठी दावा मजबूत

शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे स्टार्टअप

भारतातील सर्वात मोठा आयपीओ; केंद्र एलआयसीतील 5 टक्के समभागांची विक्री करणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.