AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PPF CLAIM STATUS: ऑनलाईन पीपीएफ क्लेम कसा चेक कराल? सोप्या पाच स्टेप्स एका क्लिकवर

तुम्हाला पीपीएफ खात्यात (PPF ACCOUNT) लॉग-इन करावे लागेल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. तुमचं पीपीएफ खातं बँकेत असले तरीही तुम्हाला स्थिती ऑनलाईनच तपासावी लागते.

PPF CLAIM STATUS: ऑनलाईन पीपीएफ क्लेम कसा चेक कराल? सोप्या पाच स्टेप्स एका क्लिकवर
PPF CLAIM STATUSImage Credit source: TV9
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 27, 2022 | 11:22 PM
Share

नवी दिल्लीः भविष्य निर्वाह निधी (PPF) खात्यातून पैसे काढण्यासाठी अर्ज केल्यास त्याची स्थिती तपासणे देखील महत्वाचे आहे. मॅच्युरिटीनंतर पीपीएफ खात्यात पैसे जमा होतात. खात्यात जमा झालेल्या पैशाच्या स्थितीविषयी ईमेल किंवा फोनच्या माध्यमातून माहिती मिळत नाही. तुम्ही पीपीएफ खाते ऑनलाईन उघडले असल्यास त्याच्या क्लेमची स्थिती (CLAIM STATUS) देखील ऑनलाईनच तपासावी लागते. त्यासाठी तुम्हाला पीपीएफ खात्यात (PPF ACCOUNT) लॉग-इन करावे लागेल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. तुमचं पीपीएफ खातं बँकेत असले तरीही तुम्हाला स्थिती ऑनलाईनच तपासावी लागते. दुसरीकडे पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ खात्याच्या बाबतीत तुम्हाला ऑफलाईनच स्थिती जाणून घ्यावी लागते. तुम्हाला विशिष्ट प्रकारचा अर्ज भरुन क्लेम स्थितीची माहिती प्राप्त होईल.

पीपीएफ क्लेम स्थिती ऑनलाईन:

· तुमचे पीपीएफ खाते असलेल्या बँकेत पीपीएफ नेट बँकिंग सोबत जोडण्यासाठी फॉर्म भरा

· तुम्हाला नेट बँकिंगचा यूजर आयडी प्राप्त होईल. तुम्ही पासवर्ड बनवून घ्या. बँकेच्या नेट बँकिंगमध्ये लॉग-इन करा. त्यानंतर तुमच्या पीपीएफ क्लेम स्थिती प्रक्रियेला सुरुवात होईल.

· तुम्हाला क्लेमची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळी लॉग-इन करणे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर क्लेम प्रक्रियेला सुरुवात करता येईल.

· काही बँका पीपीएफ डिपॉझिट केवळ ऑनलाईनच जमा करतात. त्यामुळे पीपीएफ विद्ड्रॉल स्थिती केवळ ऑनलाईनच जाणून घेता येईल

· तुमचं पीपीएफ खातं पोस्टात असल्यास तुम्ही थेट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्थिती विषयी माहिती जाणून घेऊ शकतात.

पीपीएफ मधून पैसे कधी:

· खाते उघडल्यानंतर सातव्या वर्षापासून आंशिक स्वरुपातून पैसे काढले जाऊ शकतात

· प्रत्येक आर्थिक वर्षात केवळ एकदाच आंशिक विद्ड्रॉल केले जाऊ शकते

· तुमच्या पीपीएफ खात्याची पूर्ण रक्कम केवळ मॅच्युरिटी वेळीच काढली जाऊ शकते.

· पीपीएफ खाते उघडल्यानंतर 15 वर्षानंतर खात्याची मॅच्युरिटी असते

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ