AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिडकोच्या जानेवारी 2022 गृहनिर्माण योजनेच्या सोडतीचा प्रारंभ, सिडकोची घरे सर्वसामान्यांना परवडणारी, मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

सध्याच्या महागाई  (Inflation)आणि मंदीच्या काळात सिडकोची परवडणाऱ्या दरातील घरे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणारी असल्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

सिडकोच्या जानेवारी 2022 गृहनिर्माण योजनेच्या सोडतीचा प्रारंभ, सिडकोची घरे सर्वसामान्यांना परवडणारी, मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
एकनाथ शिंदे
| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 8:34 PM
Share

नवी मुंबई : सध्याच्या महागाई  (Inflation)आणि मंदीच्या काळात सिडकोची परवडणाऱ्या दरातील घरे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणारी असल्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी म्हटले आहे. सिडकोच्या जानेवारी-2022 गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीचा प्रारंभ एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाइन (Online) पद्धतीने करण्यात आला यावेळी ते बोलत होते. सिडको साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच अन्य अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे नवी मुंबईमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांना घरांमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी या सोडतीमध्ये घर मिळालेल्या अर्जदारांचे अभिनंदन देखील केले. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी  प्रास्ताविकामध्ये गृहनिर्माण योजनेची संक्षिप्त माहिती देत, सिडको सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

माजी लोकायुक्तांच्या देखरेखीखाली सोडत

सदर संगणकीय सोडत प्रक्रियेवर देखरेख करण्याकरिता सिडकोतर्फे सुरेश कुमार, माजी लोकायुक्त यांच्या पर्यवेक्षणाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या देखरेख समिती व्यतिरिक्त, अर्जदारांपैकी संतोष पिंपळे, मधुकर पिसाळ आणि राजेश चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले. सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.

सुरुवातीला 5,730 सदनिकांचा समावेश

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे 26 जानेवारी 2022 रोजी प्रारंभ करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत सुरुवातीस 5,730 सदनिका तळोजा नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यानंतर अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील आणखीन काही रिक्त सदनिकांची भर घालून एकूण 6,508 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण 6,508 घरांपैकी 1,905 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि 4,603 सदनिका ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.  जानेवारी-2022 गृहनिर्माण योजनेच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

खाद्य तेलाच्या किमती भडकल्या; अन्न महागाईमध्ये महिन्याभरात 17 टक्क्यांची वाढ, धान्याच्या भावात देखील तेजी

आत लवकरच डेबीट कार्डशिवाय ATM मधून काढता येणार पैसे, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा

शेअर बाजारातील घसरणीला अखेर आज ब्रेक; सेंसेक्समध्ये 412 अंकाची वाढ, गुंतवणूकदारांना दिलासा

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.