NPS च्या या योजनांमध्ये 6 महिन्यात 20 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा, वाचा तुम्हीही कसा नफा मिळवू शकता

सरकारी संस्था राष्ट्रीय पेंशन प्रणाली (NPS) योजना खूप चांगला पर्याय आहे. या योजनांनी गुंतवणुकदारांना मागील 6 महिन्यात जवळपास 21.78 टक्के परतावा दिलाय. या योजना खालीलप्रमाणे...

NPS च्या या योजनांमध्ये 6 महिन्यात 20 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा, वाचा तुम्हीही कसा नफा मिळवू शकता
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 3:58 AM

मुंबई : निवृत्तीनंतरचं भविष्य सुरक्षित असावं म्हणून आत्तापासूनच गुंतवणूक करणं आवश्यक असतं. तुम्हालाही भविष्यात उपयोगी पडेल अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी सुरक्षित परतावा देणाऱ्या अशा काही योजना पाहुयात. तुम्हीही आतापासूनच या नफा मिळवून देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करु शकता. यासाठी सरकारी संस्था राष्ट्रीय पेंशन प्रणाली (NPS) योजना खूप चांगला पर्याय आहे. या योजनांनी गुंतवणुकदारांना मागील 6 महिन्यात जवळपास 21.78 टक्के परतावा दिलाय. या योजना खालीलप्रमाणे (List of NPS schemes which gives more than 20 percent return on investment within 6 months),

1. एलआयसी पेंशन फंड

एनपीएस योजनांच्या परतावा आकडेवारीनुसार, 31 मे 2021 पर्यंत गुंतवणुकदारांना एलआयसी पेंशन फंड टियर -1 मध्ये 23.03 टक्के परतावा मिळालाय. तसेच योजना ई टिअर -2 मध्ये मागील 6 महिन्यात 22.82 टक्के चांगला परतावा मिळाला.

2. एचडीएफसी पेंशन फंड

मागील 6 महिन्यात एचडीएफसी पेंशन फंड स्कीम टियर-1 मध्ये 21.35 टक्के आणि टियर-2 मध्ये 21.23 टक्के परतावा मिळाला. वॅल्यू रिसर्चच्या अहवालानुसार, एचजीएफसी पेंशन फंड आता एलआयसी पेंशन फंडपासून काही पावलंच दूर आहे.

3. यूटीआय सेवानिवृत्ती समाधान निधी

एनपीएस स्कीम अंतर्गत यूटीआय रिटायरमेंट सॉल्यूशन फंड स्कीमने गुंतवणुकदारांना टियर-1 मध्ये 21.97 टक्के, तर टियर-2 मध्ये 23.07 टक्के परतावा दिलाय.

4. आयसीआयसीआई पेंशन फंड

मागील 6 महिन्यांमध्ये मे 2021 पर्यंत आयसीआयसीआय पेंशन फंड स्कीमने ई टियर -1 मध्ये 21.44 टक्के परतावा दिलाय. टियर -2 मध्ये या योजनेने 21.34 टक्क्यांचा परतावा दिलाय.

5. एसबीआय पेंशन फंड

या योजनेने टियर -1 मध्ये 19.78 टक्के आणि टियर -2 मध्ये 21.75 टक्के परतावा दिलाय.

एनपीएसमध्ये गुंतवणूक कशी करावी?

नॅशनल पेंशन प्रणाली (एनपीएस) सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. ही योजना लोकांना निवृत्तीनंतरच्या काळासाठी बचत करण्यासाठी मदत करते. गुंतवणुकीसाठी टियर-1 आणि टियर-2 अकाऊंटमध्ये नियमितपणे कॉन्ट्रिब्‍यूशन करण्याचे दोन पर्याय असतात. एनपीएसच्या पैशांचं व्यवस्थापन स्‍वतंत्र पोर्टफोलियो मॅनेजर करतात. असं असलं तरी गुंतवणुकदार यात ऑनलाइन बदल करु शकतात.

एनपीएस टियर-1 अकाउंटमध्ये निवृत्तीनंतर एकूण रकमेच्या 60 टक्के भाग एकरकमी विनाकर घेऊ शकता. बाकी 40 टक्के पैशांतून आजीवन पेंशन घेऊ शकता. टियर-2 एक प्रकारचा गुंतवणूक प्लॅन आहे. त्यामुळे त्यातून गरजेप्रमाणे केव्हाही पैसे काढता येतात.

हेही वाचा :

विमा पॉलिसी घेताना चुकूनही करु नका ‘या’ 5 चुका, नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान

45 व्या वर्षापर्यंत 5 कोटी रुपयांची बचत हवीये? SIP मध्ये किती गुंतवणूक कराल?

पोस्ट ऑफिस की बँक, कुठे होतील पैसे झटपट दुप्पट, जाणून घ्या

व्हिडीओ पाहा :

List of NPS schemes which gives more than 20 percent return on investment within 6 months

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.