Post Office Scheme : कर तर वाचवाच, पण गुंतवणुकीवरही मिळणार जबरदस्त परतावा, पोस्टाच्या या योजनेत डबल फायदा

Post Office Scheme : मार्च एंडपूर्वी तुम्हाला कर सवलत मिळवायची असेल तर पोस्टाची ही योजना उपयोगी ठरू शकते. कर तर वाचेलच पण या गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा ही मिळेल. तुमचा डबल फायदा होईल.

Post Office Scheme : कर तर वाचवाच, पण गुंतवणुकीवरही मिळणार जबरदस्त परतावा, पोस्टाच्या या योजनेत डबल फायदा
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 10:25 PM

नवी दिल्ली : मार्च महिना संपत येत आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात गुंतवणूक करुन अनेक जण कर वाचविण्याचा प्रयत्न करतील. कर बचतीसाठी बाजारात अनेक योजना आहेत. म्युच्युअल फंड, एलआयसी आणि इतर ही अनेक योजना आहेत. पण तुम्हाला परंपरागत योजनेतही पोस्टाची ही योजना मालामाल करेल. या योजनेत तुम्हाला कर सवलत तर मिळवता येईलच पण जोरदार परतावा पण मिळेल. तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. पोस्ट कार्यालयाच्या 5 योजनांमध्ये आयकर खात्याच्या अधिनियम (Income Tax Act ) 80सी नियमातंर्गत मोठा फायदा होईल. खातेदाराला बचतीसह कर सवलतीचा (Tax Deduction) ही लाभ घेता येईल. एकाच योजनेवर डबल फायदा घेता येईल.

या बचत योजनांमध्ये खातेदारांना गुंतविलेल्या रक्कमेवर चांगले व्याज मिळते. या योजनेची कागदपत्रे जोडून आयकर रिटर्न भरल्यास कर सवलत मिळते.आयकर खात्याच्या सेक्शन 80C अंतर्गत सवलतीचा लाभ घेता येतो. 31 मार्च 2023 रोजी पूर्वी प्राप्तिकर सवलत घ्यायची असेल तर या योजना उपयुक्त ठरेल. गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळेल. कर सवलतीसाठी गुंतवणूकदाराला दावा दाखल करता येईल.

कर सवलतीसाठी राष्ट्रीय निवृत्ती योजना फायदेशीर योजना आहे. या योजनेत आयकर अधिनियम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. यासोबतच या योजनेत रिटायरमेंट फंडची पण तजवीज होते. ही रक्कम जमा होणार असल्याने उतारवयात चांगली रक्कम गाठीशी असेल. तुमच्या औषधपाण्याच्या खर्चाची त्यामुळे तु्म्हाला चिंता करण्याची गरज नसेल. उतारवयातील आर्थिक तरतूदीसाठी ही योजना सर्वोत्तम मानण्यात येते.

हे सुद्धा वाचा

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (Public Provident Fund Scheme) गुंतवणूक आजच्याघडीला मालामाल करणारी आहे. या योजनेवर सध्या 7.1 टक्क्यांचा परतावा मिळतो. या योजनेत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. ईपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला 8.1 टक्के व्याज मिळते. तसेच आयकर सवलतीचा लाभ ही घेता येतो. आयकर अधिनियमाची कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजनाही गुंतवणुकीसाठी उत्तम मानण्यात येते. ही एक अल्पबचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला व्याज मिळते. 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलत मिळविता येते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता.

अटल पेन्शन योजनेत अत्यंत कमी मासिक हप्ता भरुन तुम्ही दर महिन्याला निवृत्ती रक्कम मिळवू शकता. या योजनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. तर योजनेतंर्गत गुंतवणुकीवर 80C नियमान्वये आयकर सवलत मिळते. पोस्ट कार्यालयाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यावर आयकर अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत लाभ मिळतो. गुंतवणूकदारांना 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलतीसाठी दावा दाखल करता येतो. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. या योजनेवरील व्याजदरात बदल होतो.

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.