AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Booking Offer: घरातला सिलेंडर बुक करताना ‘ही’ गोष्ट करा आणि मिळवा 900 रुपयांची डिस्काऊंट

LPG Booking | इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, जो ग्राहक पहिल्यांदा पेटीएम अ‍ॅपद्वारे LPG सिलिंडर बुक करेल, त्याला 900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला 3 वेळा LPG सिलिंडर बुकिंगवरही 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

LPG Booking Offer: घरातला सिलेंडर बुक करताना 'ही' गोष्ट करा आणि मिळवा 900 रुपयांची डिस्काऊंट
एलपीजी गॅस
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 1:09 PM
Share

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्यांच्या किचनमधील बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक कोणतीही खरेदी करताना जमेल तितकी बचत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर Paytm ची एक खास ऑफर कॉमन मॅनसाठी फायद्याची ठरू शकते. या ऑफरमुळे तुम्हाला घरगुती सिलेंडरच्या खरेदीवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, जो ग्राहक पहिल्यांदा पेटीएम अ‍ॅपद्वारे LPG सिलिंडर बुक करेल, त्याला 900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला 3 वेळा LPG सिलिंडर बुकिंगवरही 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

Paytm वरुन सिलेंडर बुक कसा कराल?

* सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. * अ‍ॅप लॉगीन केल्यानंतर, तुम्हाला सिलेंडर बुकिंग या पर्यायावर क्लिक करावे. * त्यानंतर सर्च ऑप्शनवर जाऊन त्यात Recharge And Bill Pay या ऑप्शनवर क्लिक करु शकता. * यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एका पर्यायाची तुम्ही निवड करावी. * गॅस प्रोव्हायडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID क्रमांक टाकावा लागेल. * यानंतर पुढील प्रोसेस फॉलो करुन तुम्ही सिलिंडर बुक करु शकता.

मुंबईत पाईप गॅसच्या दरात वाढ

बुधवारी मध्यरात्रीपासून मुंबईत CNG आणि पाईप गॅसच्या दरात वाढ झाली आहे. हानगर गॅसकडून सीएनजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार CNG च्या दरात प्रतिकिलो 2 रुपये 58 पैसे आणि घरगुती गॅसच्या दरात प्रतियुनिट 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

महानगर गॅसच्या एक किलो सीएनजीसाठी आता 51.98 रुपये मोजावे लागतील. तर पाईप गॅसच्या स्लॅब 1 साठी 30.40 रुपये प्रतियुनिट आणि स्लॅब 2 साठी 36 रुपये प्रतियुनिट इतकी किंमत असेल. काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून घरगुती गॅसच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली होती.

संबंधित बातम्या:

CNG Price Hike Mumbai: मुंबईत CNG आणि पाईप गॅसच्या दरात वाढ

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ

Petrol Rate: निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या दरात 11 रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचा दर

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.