AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Credit score म्हणजे काय रे भाऊ? खराब क्रेडिट स्कोरचे तोटे समजून घ्या

क्रेडिट स्कोरलाच (Credit score) सिबिल स्कोर असे देखील म्हटले जाते. तुमचा क्रेडिट स्कोर हा तुमच्या आर्थिक व्यवाहारांवर अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या बँकेकडून (bank) कर्ज (Debt) घेतले आहे आणि तुम्ही त्याची वेळेत परतफेड केली तर तुमचा क्रेडिट स्कोर हा वाढतो.

Credit score म्हणजे काय रे भाऊ? खराब क्रेडिट स्कोरचे तोटे समजून घ्या
'असा' वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर
| Updated on: Mar 20, 2022 | 8:40 AM
Share

क्रेडिट स्कोरलाच (Credit score) सिबिल स्कोर असे देखील म्हटले जाते. तुमचा क्रेडिट स्कोर हा तुमच्या आर्थिक व्यवाहारांवर अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या बँकेकडून (bank) कर्ज (Debt) घेतले आहे आणि तुम्ही त्याची वेळेत परतफेड केली तर तुमचा क्रेडिट स्कोर हा वाढतो. क्रेडिट स्कोरच्या आधारावर तुम्हाला पुन्हा दुसरे आणि ते पण स्वस्त व्याजदराने कर्ज मिळू शकते. क्रेडिट स्कोर खराब होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे जर तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले, तुम्ही जर त्या कर्जाची वेळेत परतफेड करू शकला नाहीत, किंवा बँकेचे हप्ते थकले तर त्याचा फटका तुम्हाला बसतो आणि तुमचा क्रेडिट स्कोर खराब होतो. दुसरा महत्त्वाचं एक कारण असे आहे की, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात आतापर्यंत कोणत्याही बँकेशी पैशांशी संबंधित व्यवहार केलाच नसेल तर तुमचा क्रेडिट स्कोर हा कमी राहातो. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित अनेक सुविधापासून वंचित राहावे लागते. क्रेडिट स्कोर खराब असल्यास तुम्हाला त्याचा फटका कसा बसू शकतो हेच आज आपण समजून घेणार आहोत.

लोन मिळत नाही

तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुम्हाला लोन मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला बँका आणि आर्थिक संस्था लोन देण्यास टाळाटाळ करतात. जर समजा तुम्हाला लोन दिलेच तर त्याचा व्याज दर प्रचंड जास्त असतो. म्हणजेच तुम्हाला व्याजापोटी मोठी रक्कम बँकेला द्यावी लागतो.

ईएमआयवर वस्तू घेण्यास समस्या

तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल आणि जर तुम्हाला एखाद्या दुकानातून मोठी वस्तू हप्त्यांवर घ्यायची असेल जसे की, मोबाईल, फ्रीज, वॉशिंगमशीन, टीव्ही यासारख्या वस्तू तर त्या तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला कोणतीही वस्तू कॅशमध्येच घ्यावी लागेल.

होमलोन घेण्यासाठी समस्या

जर तुमचा क्रेडिट स्कोर हा खराब असेल आणि तुम्ही जर होमलोनसाठी एखाद्या बँकेत अप्लाय केले. तर तुमचा अर्ज बँकेकडून फेटाळला जातो. तुम्हाला होमलोन मिळत नाही. त्यामुळे तज्ज्ञांकडून तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्याचा सल्ला दिला जातो. क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी बँकिंग व्यवहारांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असते.

संबंधित बातम्या

जपानी कंपनी Suzuki Motor भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना

अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

गुंतवणूकदारांना Paytm चा धडा; आयपीओमधील गुंतवणूक पडली भारी, लाखो रुपयांना फटका

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.