मोबाईल नंबर पोर्ट करायचाय, कंपनी चालढकल करतेय, कुठे तक्रार कराल?

Mobile number | तुम्ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'कडे (TRAI) याची तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार मिळाल्यानंतर 'ट्राय'कडून संबंधित कंपनीवर योग्य कारवाई केली जाते. नेटवर्क प्रोव्हायरडकडे वारंवार दाद मागूनही काही फायदा होत नसेल तर तुम्ही 'ट्राय'ला तसा ईमेल पाठवावा.

मोबाईल नंबर पोर्ट करायचाय, कंपनी चालढकल करतेय, कुठे तक्रार कराल?
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: स्मार्टफोनधारकांना मोबाईल कॉल ड्रॉप होणे किंवा डेटा स्पीड कमी असणे, अशा समस्यांना अनेकदा सामोरे जावे लागते. कंपनीकडे वारंवार याची तक्रार करून समस्या सुटत नसेल तर ग्राहक मोबाईल क्रमांक पोर्ट करायचा पर्याय स्वीकारतात. परंतु, मोबाईल नंबर पोर्ट करताना ग्राहकांना हमखास मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांच्या मनमानीचा अनुभव येतो. या कंपन्या ग्राहक आपल्याकडून दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नये, यासाठी पोर्ट आऊटच्या प्रक्रियेत आढेवेढे घेतात, चालढकल करतात. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते.

मात्र, तुम्ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’कडे (TRAI) याची तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार मिळाल्यानंतर ‘ट्राय’कडून संबंधित कंपनीवर योग्य कारवाई केली जाते. नेटवर्क प्रोव्हायरडकडे वारंवार दाद मागूनही काही फायदा होत नसेल तर तुम्ही ‘ट्राय’ला तसा ईमेल पाठवावा. यामध्ये तुम्ही कंपनीला केलेल्या तक्रारींचा क्रमांक आणि इतर तपशील नमूद करावा.

नियम काय आहे?

2011 पासून भारतात मोबाईल पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे तुम्हाला एखाद्या कंपनीकडून चांगली सेवा मिळत नसेल तुम्ही दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट करू शकता. त्यासाठी तुम्ही 1900 या क्रमांकावर मेसेज करुन पोर्ट आऊटची रिक्वेस्ट पाठवू शकता. त्यानंतर हा पोर्ट नंबर नव्या कंपनीला देऊन तुम्ही नेटवर्क चेंज करू शकता. नंबर पोर्ट आऊट करण्यासाठी साधारण पाच दिवसांचा अवधी लागतो.

ग्राहकांना काय अधिकार असतात?

तुम्ही जेव्हा मोबाईल नंबर एका कंपनीतून दुसरीकडे पोर्ट आऊट करता तेव्हा तुमची कंपनी हमखास त्यामध्ये अडथळे आणते. तुम्हाला त्याच कंपनीत राहण्यासाठी अनेक प्रलोभनं दाखवली जातात. या प्रक्रियेत चालढकल केली जाते. तुमचा क्रमांक पोस्टपेड असेल तर मोबाईल कंपन्या पोर्ट आऊटसाठी बरेच आढेवेढे घेतात. अशावेळी तुम्ही TRAI अथवा ग्राहक संरक्षण केंद्राकडे दाद मागू शकता. त्यानंतर नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर ग्राहकाला नुकसानभरपाई मिळते.

संबंधित बातम्या:

महागडा मोबाईल, त्याचा विमा, नंतर क्लेम, पोलिसात तक्रारीचा कट आणि महिला अडचणीत

भारतात कोणती कंपनी मोबाईल इंटरनेटमध्ये अव्वल? ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान लाँच, 100 जीबीचा हायस्पीड डेटा मिळणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI