Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांची झाली चांदी; 15 दिवसांमध्ये पैसे डबल

अजय देशपांडे

|

Updated on: May 06, 2022 | 7:17 AM

Veranda Learning Solutions या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या 15 दिवसांमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत दुपटीने वाढली आहे.

Multibagger Stock : 'या' कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांची झाली चांदी; 15 दिवसांमध्ये पैसे डबल
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: Tv9

मुंबई : शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची असते, अनेक जण जोखीम घेणे टाळतात. जे गुंतवणूकदार जोखीम घेण्याचे टाळतात ते आपली गुंतवणूक बँक एफडी (Bank FD) किंवा फारतर फार पोस्टाच्या एखाद्या योजनेत गुंतवतात. मात्र यामधून त्यांना मिळणारा परतावा हा मर्यादीत असतो. एका ठराविक रकमेच्यापुढे त्यांची मजल जात नाही. मात्र असे देखील काही गुंतवणूकदार असतात जे चांगल्या परताव्याच्या अपेक्षेने जोखीम घेऊन, शेअर मार्केटमध्ये (Shares market) पैसे गुंतवतात आणि त्यांना चांगला परतावा देखील मिळतो. सध्या असाच एका कंपनीचा शेअर्स चर्चेत आहे. या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 15 दिवसांमध्ये डबल परतावा दिला आहे. पैसे दाम दुपटीने वाढले ते पण अवघ्या 25 दिवसांमध्ये मग या शेअर्सची चर्चा तर होणारचना. आज आपण अशाच एका कंपनीच्या शेअर्सबद्दल (Multibagger Stock) जाणून घेणार आहोत. ज्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड के कमाईची संधी दिली. तो शेअर्स आहे Veranda Learning Solutions या कंपनीचा.

गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद

Veranda Learning Solutions ही कंपनी शैक्षणिक क्षेत्रात काम करते. या कंपनीने नुकताच आपला आयपीओ जाहीर केला. आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होताच या कंपनीच्या शेअर्सला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होताच अवघ्या 15 दिवसांमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 101 टक्क्यांनी वाढली. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी 15 दिवसांपूर्वी एक लाख गुंतवले होते, त्यांना तब्बल दोन लाख एक हजारांचा परतावा मिळाला आहे. कंपनीचा आयोपीओ जेव्हा बाजारात आला तेव्हा या कंपनीच्या शेअर्सची किंमत 137 रुपये होते. आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाल्याननंतर अवघ्या 15 दिवसांमध्ये या शेअर्सची किंमत 276.65 रुपयांवर पोहोचली. 15 दिवसांमध्ये हा शेअर्स 139 रुपयांनी वाढला.

तज्ज्ञांचा सल्ला

या शेअर्समध्ये आणखी काही दिवस तेजी राहू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मात्र कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा एकदा सल्ला आवश्य घेतला जावा असे देखील तज्ज्ञांचे मत आहे. शेअर बाजारात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीमध्ये जोखीम अधिक असते. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही दिवस संबंधित क्षेत्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यानंतरच गुंतवणुकीचा निर्णय घेतला जावा.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI