AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayushman : तुमचा हेल्थ डाटा आता एकदम सुरक्षित, केंद्र सरकारने सुरु केली ही सुविधा, होईल असा फायदा..

Ayushman : तुमच्या आरोग्याची माहिती आता एकदम सुरक्षित राहणार आहे..

Ayushman : तुमचा हेल्थ डाटा आता एकदम सुरक्षित, केंद्र सरकारने सुरु केली ही सुविधा, होईल असा फायदा..
आरोग्य माहिती होईल जतनImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 12, 2022 | 9:08 PM
Share

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे आयुष्यमान भारतचे (Ayushman Bharat) कार्ड असेल तर  तुमच्या आरोग्याची माहिती (Health Information) आता जतन करुन ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी डिजिटल प्रक्रियेचा आधार घेण्यात आला आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित माहितीचे डिजिटलयाझेशन (Digitalization) करण्यात येणार आहे. त्याचा अनेक ठिकाणी तुम्हाला फायदा होईल.

आरोग्य योजनांशी जोडलेल्या सदस्यांचा हेल्थ रेकॉर्ड डिजिटल रुपात सुरक्षित करण्यात येणार आहे. यासंबंधी डिजीलॉकरचा ही ते लाभ घेऊ शकता. डिजीलॉकरचा (Digi locker) उपयोग करुन त्याठिकाणी तुम्हाला दस्तावेज जतन करुन ठेवता येतील.

आरोग्य मंत्रालयानुसार, डिजीलॉकरच्या वापरकर्त्यांना  आरोग्य रेकॉर्ड डिजिटल रुपात सुरक्षित ठेवता येणार आहे. ते आयुष्यमान भारत आरोग्य खाते (ABHA) डिजीलॉकरला जोडू शकतात. डिजीलॉकरमुळे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन(ABDM) सोबतच इतर कागदपत्रेही जोडता येतात.

डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत दस्ताऐवज एकीकरणासाठी उपयोगी ठरू शकते. तुमची कागदपत्रे या ठिकाणी जतन करुन ठेवता येतात. तसेच आरोग्य सुविधांसाठी या कागदपत्रांची पुर्तता करता येते. अनेक ठिकाणी ही कागदपत्रे उपयोगी ठरतात.

डिजीलॉकरचे सुरक्षित क्लाउड आधारित स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये वापरकर्त्याच्या लसीकरण नोंदी, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, प्रयोगशाळा अहवाल, रुग्णालयातील सुट्टी यांची माहिती यामध्ये नोंदणी करता येते. वेळेवर ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरते.

आयुष्मान भारत आरोग्य खातेधारकाचे विविध आरोग्य रेकॉर्ड यामध्ये नोंद ठेवले जातात. आयुष्मान भारत डिजिटल मिशन नोंदणीकृत आरोग्य सुविधा रुग्णालये आणि प्रयोगशाळा यातंर्गत जोडली जाणार आहेत.

वापरकर्त्यांना या अॅपवर त्यांचे जूने आरोग्य रेकॉर्ड स्कॅन करुन अपलोड करता येतात. या सुविधेचा 13 कोटी वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. भविष्यात डिजीलॉकरच्या मदतीने उपचारासाठी ही कागदपत्रे आपोआप प्राप्त होतील.

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती