ना कार्ड, ना पैसे, आता थेट FASTag द्वारे पेट्रोल भरता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया?

यापाठोपाठ आता पेट्रोल पंपावर तुम्हाला फास्टॅगच्या माध्यमातून पैसे भरता येतील, अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोलसाठी जास्त त्रास होणार नाही.

ना कार्ड, ना पैसे, आता थेट FASTag द्वारे पेट्रोल भरता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया?
fastag-

मुंबई : डिजीटल व्यवहारमुळे बरेच काही बदलले आहे. यापूर्वी प्रत्येक ठिकाणी काहीही खरेदी केल्यावर आपल्याला रोख रक्कम ठेवावी लागायची. त्यानंतर कालांतराने रोख रक्कमेची जागा कार्डने घेतली आहे. पण आता तर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठीही कार्डची आवश्यकता भासत नाही. तुम्ही आता एटीएम कार्डशिवाय तुमच्या फोनद्वारे सहजरित्या कोणतेही व्यवहार करु शकता. त्यामुळे आता घराबाहेर पडताना तुम्हाला पैसे किंवा कार्डची आवश्यकता भासणार नाही. विशेष म्हणजे आता सर्वांना FASTag द्वारे पेट्रोल पंपावर इंधन देखील खरेदी करता येणार आहे.

सध्या अनेक टोल नाक्यांवर टॅक्स भरण्यासाठी फास्टॅगचा वापर केला जात आहे. तर काही ठिकाणी फास्टॅगच्या माध्यमातून पार्किंगचेही पैसे देण्याची सुविधा सुरु केली होती. यापाठोपाठ आता पेट्रोल पंपावर तुम्हाला फास्टॅगच्या माध्यमातून पैसे भरता येतील, अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोलसाठी जास्त त्रास होणार नाही. तसेच तुम्ही खरेदी केलेल्या पेट्रोलचे पैसे थेट तुमच्या खात्यातून वजा केले जातील.

हे नेमकं कसं शक्य आहे. फास्टॅगद्वारे व्यवहार कसे केले जाईल? त्यासाठी काय करावे लागेल? या सर्व प्रश्नांची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

फास्टॅगद्वारे पेट्रोल पंपांवर पैसे भरता येणार 

दरम्यान इंडियन ऑईल आणि आयसीआयसीआय बँकेतर्फे एकत्रित ही सुविधा दिली जात आहे. याअंतर्गत तुम्हाला इंडियन ऑईलच्या सर्व पेट्रोल पंपांवर कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहार करता येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना फास्टॅगच्या माध्यमातून इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर पैसे भरता येणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कारमध्ये पेट्रोल भराल तेव्हा तुमच्या फास्टॅग खात्यातून पैसे आपोआप वजा केले जातील. सध्या इंडियन ऑईलच्या अनेक आऊटलेट्समध्ये याची व्यवस्था केली जात आहे.

व्यवहार कसा करता येईल?

मिळालेल्या माहितीनुसार, FASTag द्वारे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट प्रक्रियेची अंमलबजावणी करावी लागेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रथम ग्राहकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तुम्ही फास्टॅगद्वारे पैसे देणार आहेत, याची पूर्वकल्पना द्यावी लागेल.

💠यानंतर, तो कर्मचारी तुमच्या कारवर असलेला FASTag स्कॅन करेल.

💠यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.

💠जेव्हा हा ओटीपी केवळ पीओएस मशीनमध्ये नोंदवल्यानंतर तुमचा व्यवहार पूर्ण होईल.

💠म्हणजेच फास्टॅग हा टोल प्लाझासारख्या ठिकाणी वापरतात तसा वापरता येणार नाही.

कसा खरेदी कराल फास्ट टॅग?

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

(Now you can use Fastag to pay for fuel know the full process)

संबंधित बातम्या : 

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

FASTag | आता व्हॉट्सॲपसह ‘या’ पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI