Online Betting : सट्टेबाजांवर नजर, सरकार आता अॅक्शन मोडवर..

Online Betting : सट्याचा बटा तर लागेलच, पण सरकारच्या कारवाईचा दंडूका ही पडेल..

Online Betting : सट्टेबाजांवर नजर, सरकार आता अॅक्शन मोडवर..
सट्टेबाजांवर लवकरच कारवाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 8:20 PM

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियात T-20 क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup) सुरु आहे. अशात तुमच्या आजुबाजूला सट्टेबाजांना पकडल्याच्या बातम्या तुम्ही वाचत असाल. देशात सट्टा लावणे बेकायदेशीर (Illegal) आहे. तरीही देशात दररोज कोट्यवधींचा सट्टा लावण्यात येतो. सट्टेबाज तर आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. ऑनलाईन सट्टेबाजीला (Online Betting) देशभरात ऊत आला आहे.

सट्टेबाज नवनवीन युक्त्या वापरतात. आता तंत्रज्ञान दिमतीला आल्यापासून त्यांचा सट्याचा व्यवसाय दणक्यात सुरु आहे. एक दोन कारवाई वगळता सट्टेबाजांवर फार मोठी कारवाई होताना दिसत नाही.

ऑनलाईन सट्टेबाजीमुळे सट्टेबाजांना पकडणे कठिण झाले आहे. आता सट्टा लावण्यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. त्याआधारे सट्टेबाज ऑनलाईन सट्टा लावतात. अॅप्सच्या मदतीने सट्टा लावणे अधिक सोपे झाले आहे.

हे सुद्धा वाचा

अॅप्सच्या वापरामुळे सट्टेबाजांना अटक करणे कठिण झालेले नाही तर अर्थव्यवस्थेलाही मोठे नुकसान होत आहे. देशातील सट्टेबाजीच्या बाजाराने जवळपास 6 लाख कोटींचा आकडा पार केला आहे.

विविध अॅप्सवर सट्टेबाजीला प्रोत्साहित करणाऱ्या अॅडचा ही महापूर सुरु आहे. सरकारचे या सर्वांवर बारीक लक्ष्य असून लवकरच त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

चांगल्या इंटरनेट सुविधा, स्वस्तात मिळणारे स्मार्टफोन यामुळे ऑनलाईन सट्टेबाजीचा बाजार सातत्याने वाढत आहे. ऑनलाईन अॅपच्या मदतीने सट्टेबाजांना सट्टा खेळणे सोप्पे झाले आहे.

या ऑनलाईन अॅप्सच्या माध्यमातून नाणेफेकीपासून, गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशा अनेक प्रकारात सट्टा लावण्यात येतो.

दोहा के ‘इंटरनेशनल सेंटर फॉर स्पोर्ट सिक्योरिटी’ च्या दाव्यानुसार 2016 मध्ये सट्टेबाजीचा आकडा 10 लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. तर भारताचा सट्टा बाजार 6 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, फेयरप्ले, परीमॅच, बेटवे, वुल्फ, 777 आणि 1xबेट यासारख्या अॅपच्या माध्यमातून हा व्यवसाय चालतो. सरकारने केलेल्या दाव्यानुसार, स्पोर्टस चॅनल आणि OTT प्लॅटफॉर्मवर सट्टेबाजीच्या जाहिराती सुरु असून सरकार त्यावर लक्ष्य आहे.

हे अॅप्स देशाच्या बाहेर कार्यरत आहेत. ते कर चोरी करत असल्याचे ही उघड झाले आहे. त्यामुळे सरकार आता त्यांच्याविरोधात लवकरच कडक कारवाई करण्याची शक्यता आहे.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.