5

Diesel Price | रिटेल स्थिर, होलसेल महाग; डिझेल खरेदीसाठी का लागल्या रांगा? जाणून घ्या एका क्लिकवर!

तुम्हाला ठोक खरेदी (बल्क बायर) म्हणजे काय? असा प्रश्न नक्कीच पडला असेल. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel rate)ठोक खरेदीला बल्क बायर म्हटलं जाते.

Diesel Price | रिटेल स्थिर, होलसेल महाग; डिझेल खरेदीसाठी का लागल्या रांगा? जाणून घ्या एका क्लिकवर!
जाणून घ्या, डिझेलच्या दरांबाबतची महत्त्वाची अपडेटImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 10:08 PM

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंधन भाववाढीची चर्चा आहे. पेट्रोलचे भाव सव्वाशेपार पोहचण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाववाढीपूर्वीच पेट्रोल-डिझेलच्या ठोक खरेदीचे मेसेज व्हायरल होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या ठोक खरेदीला बल्क बायर (Bulk buyers) म्हटलं जातं. दोन दिवसांपूर्वीच ठोक खरेदीसाठीच्या पेट्रोल-डिझेलच्या भावात प्रति लीटर 25 रुपये वाढ करण्यात आली आहे. तुम्हाला ठोक खरेदी (बल्क बायर) म्हणजे काय? असा प्रश्न नक्कीच पडला असेल. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel rate)ठोक खरेदीला बल्क बायर म्हटलं जाते. तेल कंपन्यांकडून ठोक खरेदीदार थेट टँकर भरुन इंधन खरेदी करतात. तेल कंपन्यांनी (OMC) ठोक खरेदीदारांसाठी पेट्रोल-डिझेलच्या भावात 25 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ केली आहे.

रिटेल स्थिर, होलसेल महाग!

तेल कंपन्यांनी ठोक तेल खरेदीच्या भावात वाढ केली आहे. मात्र, रिटेल तेलाचे भाव गेल्या 135 दिवसांपासून स्थिर आहेत. ठोक तेल खरेदीच्या भाववाढीला रशिया-युक्रेन वादाचं कारण सांगितलं जातं. मात्र, केवळ ठोक इंधनाची भाववाढ आणि रिटेलचे भाव स्थिर असे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. केंद्र सरकार इंधनाच्या वाढत्या किंमतीचा भार सामान्य जनतेच्या माथ्यावर टाकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे ठोक तेल खरेदी करणाऱ्यांमध्ये समावेशित कारखानदार, एअरपोर्ट, बस, मॉल आदी व्यावसायिकांवर इंधन दरवाढीचा भार असेल.

ठोक खरेदीचा परिणाम काय?

ठोक खरेदीदारांसाठी इंधनाच्या किंमती प्रती लीटर 25 रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, इंधन खरेदीतील भाववाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. डिझेलच्या भाववाढीमुळे वस्तूंच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढणार आहे. भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे भाजीपाला व अन्य जीवनपयोगी साहित्याच्या भाववाढीचा भार सर्वसामान्यांना सोसावा लागेल.

भाववाढीचा मुहूर्त लांबणीवर?

उत्तरप्रदेश सहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (ASSEMBLY ELECTION) निकाल घोषित करण्यात आला आहे. शंभरीपार पोहचलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन मतदारांची नाराजी टाळण्यासाठी केंद्रानं निवडणूक काळात दरवाढ केली नसल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे केंद्र सरकार पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. दरम्यान, निकाल लागून आठवडा उलटल्यावरही भाव स्थिर राहिल्याने भाववाढीचा मुहूर्त लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

कर्जाच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीची जाळे; हे सहा उपाय वाचवतील तुमचे पैसे

PNB Tax Saver FD : ऑनलाइन खातं उघडा आणि टॅक्स वाचवा; कसं, ते वाचा सविस्तर

तुमचा Credit score कमी आहे? चिंता करू नका; ‘या’ काही सोप्या उपयांनी वाढवा आपला क्रेडिट स्कोर

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?