AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : आता मोबाईलवरुन घरबसल्या काढा पीएफ, प्रक्रिया आहे इतकी सोपी

EPFO : गरजेच्यावेळी पीएफची रक्कम तुम्हाला मदतीला येऊ शकते. आता पहिल्यासारखी पीएफसाठी कसरत करावी लागत नाही. घरबसल्या केवळ मोबाईलच्या मदतीने तुम्ही ही रक्कम काढू शकता.

EPFO : आता मोबाईलवरुन घरबसल्या काढा पीएफ, प्रक्रिया आहे इतकी सोपी
| Updated on: Apr 11, 2023 | 7:27 PM
Share

नवी दिल्ली : गरजेच्यावेळी पीएफची रक्कम (PF Amount) तुम्हाला मदतीला येऊ शकते. आता पहिल्यासारखी पीएफसाठी कसरत करावी लागत नाही. घरबसल्या केवळ मोबाईलच्या मदतीने तुम्ही ही रक्कम काढू शकता. उमंग ॲपच्या (Umang App) मदतीने तुम्हाला रक्कम काढता येईल. त्यासाठी ऑनलाईन काम करणाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्हाला मोबाईलच्या मदतीने पीएफ काढता येईल. पीएफ खातेदाराला निवृत्तीनंतरही ईपीएफओमधील संपूर्ण जमा रक्कम काढता येईल. तुम्हाला निवृत्तीपूर्वी रक्कम काढायची असेल तर ही पीएफची रक्कम काढता येईल.

Umang App केंद्र सरकारने उमंग ॲप सुरु केले आहे. घरबसल्या या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला पीएफची रक्कम काढता येईल. त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप फॉलो कराव्या लागतील. लोकांना अनेक खर्चासाठी ही रक्कम आवश्यक असते. अचानक आलेला घरखर्च, घराची डागडुजी, शिक्षण, लग्नकार्य, घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी लागणारा खर्च पीएफ रक्कमेतून भागविता येतो. पूर्वी पीएफची रक्कम काढण्यासाठी बँक अथवा पीएफ कार्यालयाच्या फेऱ्या कराव्या लागत होत्या. पण आता उमंग ॲपमुळे हे काम सोपं झालं आहे.

अशी काढा रक्कम

  1. उमंग ॲपच्या माध्यमातून तुम्ही ईपीएफओ खात्यातून रक्कम काढू शकता.
  2. त्यासाठी तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक (UAN) आवश्यक आहे.
  3. हा UAN अगोदर तुम्हाला आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
  4. तुमच्या मोबाईलमध्ये उमंग ॲप डॉऊनलोड करावे लागेल.
  5. उमंगमध्ये तुम्हाला ईपीएफओ सेवेत तुमची नोंदणी करावी लागेल.
  6. रक्कम काढण्यासाठी रेज क्लेम या पर्यायामध्ये युएएन क्रमांक टाकावा लागेल.
  7. ईपीएफओमधील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपी टाका.
  8. पीएफ खात्यात कोणत्या कारणासाठी पीएफ काढायचे ते नमूद करा.
  9. पीएफ काढण्याचा अर्ज जमा करा. तुम्हाला अर्जाचा क्रमांक मिळेल.
  10. या क्रमांकावरुन तुमच्या अर्जाची सध्यस्थिती काय आहे, हे ट्रॅक करता येईल.
  11. 3 ते 5 दिवसांच्या कालावधीत रक्कम तुमच्या खात्यात जमा झालेली असेल.

वारसाचे नाव असे जोडा

  1. खातेधारकाने ईपीएफओच्या www.epfindia.gov.in  या  संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. त्यानंतर खातेधारकांनी  ‘Service’ हा पर्याय निवडावा
  3. ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करावे
  4. आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा.
  5. तो तुम्हाला सॅलरी स्लीप वर (Salary Slip) सापडेल
  6. ‘Member UAN/OnlineService (OCS/OTCP)’ येथे क्लिक करा
  7. तुम्ही लॉगिन करानॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडा
  8. त्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा
  9. family declaration हा पर्याय निवडा
  10. ‘Add Family Details’ काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा
  11. ‘Nomination Details’ हा कॉलम भरा
  12. ‘Save EPF Nomination’ हा पर्याय निवडा.
  13. ‘E-sign’ निवडीनंतर ओटीपी (OTP) येईल.
  14. ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्यानॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.