Post Office RD Scheme : दरमहा 10 हजार पोस्टाच्या या स्किममध्ये गुंतवल्यास 10 वर्षांनंतर 16 लाखांचा परतावा

पोस्टाची आरडी म्हणजेच रिकरिंक डिपॉझिट. हा एक चांगला पर्याय आहे, ज्यात तुम्हाला व्याजही मिळतं आणि तुमच्या पैशांची बचतही होते.

Post Office RD Scheme : दरमहा 10 हजार पोस्टाच्या या स्किममध्ये गुंतवल्यास 10 वर्षांनंतर 16 लाखांचा परतावा
किसान विकास पत्र

जेव्हा आपण सुरक्षित ठेवींबद्दल विचार करतो, तेव्हा बहुतांश लोक हे बचत ठेव वा मुदत ठेव खात्यांचा विचार करतात. या खात्यांमध्ये पैसे सुरक्षितही राहतात, त्यावर कमी पण काही व्याजही मिळतं. यातही एक पर्याय, जो चांगला आणि विश्वासार्ह ही मानला जातो, तो म्हणजे पोस्टाची आरडी म्हणजेच रिकरिंक डिपॉझिट. हा एक चांगला पर्याय आहे, ज्यात तुम्हाला व्याजही मिळतं आणि तुमच्या पैशांची बचतही होते. शिवाय, पोस्टाच्या आरडीमध्ये परतावाही चांगला मिळतो. पोस्टाच्या याच स्किमबद्दल आम्ही तुम्हाला आज माहिती सांगणार आहोत. ( Post Office Account Recurring Deposit Scheme, Customer Benefit, Investment Plan, Invest 10 Thousand and Get 16 Lakh )

पोस्टाचं रिकरिंक डिपॉझिट अकाऊंट

पोस्टाची आरडी ही एक सरकारी हमी असणारी योजना असल्याने यावर लोकांचा विश्वास आहे. या खात्यात तुम्ही थोडे थोड करुन पैसे जमा करु शकता. या खात्यावर तुम्हाला चांगला व्याजदरदेखिल मिळतो. या खात्याचे अनेक फायदे आहे, जसं की तुम्ही जास्त किंवा कमी कालावधीसाठीही आरडी काढू शकता. कमीत कमी अगदी 100 रुपये महिन्याचीही आरडी उघडता येते. हेच नाही तर आरडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कुठलीही मर्यादा नाही, तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही यामध्ये गुंतवू शकता.

मात्र, यात एक गोष्ट वेगळी अशी की, तुम्ही जेव्हा बचत खातं वा मुदत ठेव खातं बँकेत उघडता तेव्हा त्यात दीर्घ कालावधीचे पर्याय असतात. मात्र, आरडी ही ठराविक कालावधी म्हणजेच 5 वर्षांच्या ठराविक मुदतीसाठीच उघडता येते.

व्याजाच्या बदलांसह रिकरिंग डिपॉझिट

पोस्टाची सध्याची ही सर्वात गाजलेल्या योजनांपैकी एक आहे. कारण, या खात्यावर 5.8 टक्के व्याजदर मिळतो. हा नवा नियम 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. केंद्र सरकार प्रत्येक त्रैमासिकात लहान बचत योजनांचं व्याज निश्चित करत असते. त्याद्वारेच या स्किमचं व्याज निश्चित करण्यात आलं आहे. जसं व्याज बदलतं, तसं या खात्यावरील रकमेच्या व्याजातही बदल केला जातो, ज्याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना मिळतो.
आता समजा, तुम्ही दरमहा 10,000 रुपयांची आरडी काढली, आताच्या व्याजदराप्रमाणे तुम्हाला त्यावर 5.8 टक्के व्याज मिळेल, आणि तुम्ही दरमहा 10,000 पुढची 10 वर्ष भरले तर तुम्हाला अंदाजे 16 लाखांची रक्कम परत मिळेल.

आरडीचे हप्ते चुकल्यास काय होते?

पोस्टाची आरडी काढताना ही गोष्ट महत्त्वाची आहे की, त्याचे हप्ते नियमित भरले गेले पाहिजे. नाहीतर त्यावर ग्राहकाला भुर्दंड बसू शकतो. प्रत्येक महिन्याला न चुकता ही रक्कम खात्यात जमा होणं गरजेचं आहे, जर तुम्ही एका महिन्यात हप्ता चुकवला तर 1 टक्के दंड भरावा लागतो. आणि सलग 4 महिने हप्ते चुकवले तर हे खातं आपोआप बंद होतं. त्यामुळं वेळेआधी हप्तांच्या पेमेंट करणं गरजेचं आहे.
एखाद्या ग्राहकाला अचानक पैशांची गरज लागली तर, आरडी काढल्यापासून वर्षभरानंतर त्यातील 50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी असते. काही केसमध्ये ही रक्कम 6 महिन्यांत काढण्याची परवानगी असते. आरडी सुरु केल्यानंतर जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम दिली जाते.

हेही पाहा:

फाटलेल्या नोटांची चिंता सोडा, RBI हे नियम वाचा, आणि बँकेत जाऊन नोटा बदलून घ्या!

तुमच्या पीएफ खात्याशी संबंधित अनेक सुविधा डिजीलॉकरवर देखील उपलब्ध, जाणून घ्या तपशील

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI