Post Office : पाच वर्षे नियमीत करा बचत, मग मिळवा तगडा रिटर्न

Post Office : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळेल. या योजनेत जोखीम नसल्याने बिनधास्त गुंतवणूक करुन फायदा मिळविता येईल.

Post Office : पाच वर्षे नियमीत करा बचत, मग मिळवा तगडा रिटर्न
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 9:38 PM

नवी दिल्ली : अनेक गुंतवणूकदारांना गुंतवणुकीतून जोरदार परतावा हवा असतो. तसेच त्यांना गुंतवणूक जोखीम मुक्त हवी असते. म्हणजे त्यांना कोणतीही जोखीम नको असते. तर परतावा पण चांगला हवा असतो. त्यामुळे अशा लोकांसाठी शेअर बाजार, म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक योग्य ठरत नाही. त्यांच्यासाठी पारंपारिक गुंतवणुकीचे पर्याय योग्य ठरतात. त्यासाठी मुदत ठेव योजना सर्वात चांगला पर्याय आहे. बँक असो वा पोस्ट कार्यालयातील एफडी (Post office time deposit scheme) , तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. त्यामुळे पारंपारिक पर्यायांचा विचार करत असाल तर पोस्टाची एफडी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट स्कीम (Post Office TD Account) हा चांगला पर्याय आहे. या योजनेत एक रक्कमी 1 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला 5 वर्षानंतर चांगला परतावा मिळतो. मॅच्युरिटीवर तगडा रिटर्न मिळतो. तर पाच वर्षांच्या या योजनेवर आयकर खात्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा दावा ही दाखल करता येतो.

पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव योजनेतील गुंतवणूक फायदेशीर ठरते. या योजनेत 1 वर्षापासून ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणुकीचा पर्याय खुला आहे. जसे बँकेतील एफडीतून परतावा मिळतो. तसाच परतावा पोस्ट खात्यातील या योजनेतून मिळतो. या योजनेला नॅशनल सेव्हिंग टाईम डिपॉझिट योजना असेही नाव आहे. सध्या या योजनेवर 7% हमीपात्र व्याज मिळते. 31 मार्च 2023 रोजीपर्यंत या व्याजाचा फायदा उचलता येतो. त्यानंतर व्याजदराबाबत केंद्र सरकार आढावा घेऊन नवीन दर लागू करते.

हे सुद्धा वाचा

पोस्ट खात्याच्या या पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर सध्या 7% व्याज देण्यात येते. जर तुम्ही या योजनेत एक रक्कमी 1 लाख रुपये जमा केले. तर मॅच्युरिटीवेळी एकूण 1,41,478 रुपये मिळतील. यामध्ये 41,478 रुपये केवळ व्याजाचे असतील. पोस्टाच्या या योजनेत कोणत्याही भारतीय नागरीकाला खाते उघडता येते. कोँणताही भारतीय नागरीक या योजनेत खाते उघडू शकते. या योजनेत एकल, संयुक्त, अल्पवयीन कोणीही खाते उघडू शकतो. अल्पवयीन 10 वर्षांपेक्षा मोठा असेल तर त्याच्या नावाने खाते उघडते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (Public Providend Fund Scheme) गुंतवणूक आजच्याघडीला मालामाल करणारी आहे. या योजनेवर सध्या 7.1 टक्क्यांचा परतावा मिळतो. या योजनेत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. ईपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला 8.1 टक्के व्याज मिळते. तसेच आयकर सवलतीचा लाभ ही घेता येतो. आयकर अधिनियमाची कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजनाही गुंतवणुकीसाठी उत्तम मानण्यात येते. ही एक अल्पबचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला व्याज मिळते. 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सवलत मिळविता येते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.