Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIS | 9 लाख गुंतवा, महिन्याला 5 हजार व्याज मिळवा, 5 वर्षानंतर पूर्ण रक्कमही काढा, कोणतीही आहे ही फायद्याची योजना..

MIS | पोस्ट खात्याच्या महिनावार गुंतवणूक योजनेत 9 लाख रुपये गुंतवल्यास, दर महिन्याला 5 हजार रुपये मिळवता येईल. तसेच 5 वर्षानंतर पूर्ण रक्कमही काढता येईल.

MIS | 9 लाख गुंतवा, महिन्याला 5 हजार व्याज मिळवा, 5 वर्षानंतर पूर्ण रक्कमही काढा, कोणतीही आहे ही फायद्याची योजना..
मिळवा पाच हजार रुपये व्याजImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 5:19 PM

MIS | पोस्ट ऑफिसच्या (Post Office) अल्पबचत योजनेतून गुंतवणूकदारांना फायदा होतो. त्यात महिनावार गुंतवणूक योजना (POMIS) लोकप्रिय आहे. या योजनेत दर महिन्याला कमाईची संधी मिळते. या योजनेत एकरक्कमी 9 लाख रुपये गुंतवल्यास, दर महिन्याला 5 हजार रुपये मिळवता येईल. तसेच 5 वर्षानंतर पूर्ण रक्कमही काढता येईल.

रिटायरमेंटनंतर फायदा

MIS योजनेत सिंगल आणि ज्वाईंट खाते उघडता येते. अनेक गुंतवणूकदार रिटायरमेंटनंतर या योजनेत रक्कम गुंतवतात आणि फायदा मिळवत आहेत. पोस्ट खात्याची योजना असल्याने त्यात रक्कम बुडण्याचा कुठलाही धोका नाही.

संयुक्त खात्यात गुंतवा 9 लाखांहून अधिक

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये (POMIS) एकल खातेदार जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकतो. तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवणूक करता येते. संयुक्त खात्यात दोघांपेक्षा तिघांचाही सहभाग असू शकतो. परंतु, जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात.

हे सुद्धा वाचा

महिन्याला इतका मिळेल परतावा

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमवर सध्या 6​.6​ टक्के वार्षिक परतावा मिळत आहे. योजनेत 9 लाख रुपये जमा केले तर 6.6 टक्के वार्षिक व्याजदराने एका वर्षात एकूण 59, 400 रुपये जमा होतील. या रक्कमेला 12 महिन्यात वाटल्यास, दर महिन्याला व्याजाचे 4950 रुपये दर महिन्याला मिळतील. तर एकल खातेधारकाला 4,50,000 लाखावर 2475 रुपये दर महिन्याला व्याज मिळेल.

POMIS खाते कसे उघडणार?

या योजनेत सहभागी होण्यासाठी पोस्ट खात्यात बचत खाते असणे अनिवार्य आहे. खात्याचे केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकेड आधार कार्ड, पासपोर्ट अथवा मतदान कार्ड, वाहन परवाना आवश्यक आहे. 2 पासपोर्ट साईज फोटो, पत्त्यासाठी वीज बिल अथवा इतर बिलाची प्रत आवश्यक आहे. त्यानंतर टपाल कार्यालयात जाऊन POMIS शी संबंधित अर्ज भरावा लागेल. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करावा लागेल. अर्ज भरतानाच वारसाचे नाव द्यावे लागेल . खाते उघडण्यासाठी 1000 रुपयांची रोख अथवा धनादेश द्यावा लागेल. त्यानंतर एकरक्कमी पैसा गुंतवावा लागेल.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.