Rules change from 1 June : आजपासून ‘या’ गोष्टी होणार महाग, बसणार मोठा आर्थिक फटका; जाणून घ्या नवे नियम

आज एक जून महिन्याचा पहिला दिवस आजपासून बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या बदलणाऱ्या नियमांचा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Rules change from 1 June : आजपासून 'या' गोष्टी होणार महाग, बसणार मोठा आर्थिक फटका; जाणून घ्या नवे नियम
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 7:12 AM

मुंबई : आज एक जून आजपासून नव्या महिन्याची सुरुवात झाली आहे. नव्या महिन्याबरोबरच बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील काही नियमांमध्ये (Rules changing from 1 June) आजपासून बदल होणार आहे. हे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करणार आहेत. विमा पॉलीबाबतचे नवे नियम आजपासून लागू होणार आहेत. विमा पॉलिसीसंदर्भात काय बदल होणार आहेत? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सोबतच तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक आणि इंडिया पोस्ट बँकेंची ग्राहक असाल तर या बँका देखील आपल्या काही नियमांमध्ये आजपासून बदल करणार आहेत. याशिवाय आजपासून थर्ड पार्टी वाहन विमा देखील महाग होणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या प्रमुख विमा योजना असलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) याच्या प्रीमियममध्ये देखील वाढ होणार आहे. जाणून घेऊयात आजपासून नेमके कोणते बदल होणार आहेत.

आजपासून या नियमांत बदल

  1. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या प्रीमियममध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात या योजना आधिक सशक्त करण्यासाठी तसेच त्या चालू ठेवण्यासाठी प्रीमियम वाढवने गरजेचे असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. पूर्वी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षीक हप्ता 330 रुपये होता. आता आजपासून त्यामध्ये वाढ करण्यात आली असून या योजनेसाठी 436 रुपये द्यावे लागणार आहेत.
  2. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. पूर्वी या विमा योजनेचा वार्षीक हप्ता हा 12 रुपये एवढा होता. आता त्यामध्ये वाढ करून तो 20 रुपये करण्यात आला आहे. नवी प्रीमियम वाढ आजपासून लागू करण्यात आली आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्ही बँकेकडून होम लोन घेतले असेल तर आजपासून तुमच्या इएमआयमध्ये वाढ होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होम लोनसाठी एक्सटर्नल बेंचमार्क लॅडिंग रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. EBLR 40 बेसिस पॉइंटने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आजापासून होम लोन महाग होणार आहे.
  5. अ‍ॅक्सिस बँकेकडून सॅलरी आणि सेव्हिंग खात्यावर आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खात्यातील मिनिमम शिल्लक रकमेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही 15 हजार असलेली रक्कम आता 25 हजार रुपये करण्यात आली आहे.
  6. थर्ड पार्टी वाहन विमा महागला : आजपासून थर्ड पार्टी वाहन विम्यात देखील वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा फटका हा वाहनधारकांना बसू शकतो.
  7. आज एक जून आहे, महिन्याचा पहिला दिवस असल्याने ज्येट फ्यूल आणि एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे.
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.