Saving Schemes : गुंतवणूक करायचीये? तर तुमच्यासाठी पोस्टाची ‘ही’ योजना आहे सर्वोत्तम; चांगल्या परताव्याची हमखास गॅरंटी

जर तुम्ही येणाऱ्या काळात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या विविध योजना सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. पोस्ट योजनांमध्ये पैसे गुंतवयाचे प्रमुख दोन फायदे असतात. एक म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याज दर मिळतो. आणि दुसरा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षीत राहातात.

Saving Schemes : गुंतवणूक करायचीये? तर तुमच्यासाठी पोस्टाची 'ही' योजना आहे सर्वोत्तम; चांगल्या परताव्याची हमखास गॅरंटी
अजय देशपांडे

|

Apr 17, 2022 | 7:27 AM

जर तुम्ही येणाऱ्या काळात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या विविध योजना सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. पोस्ट योजनांमध्ये पैसे गुंतवयाचे प्रमुख दोन फायदे असतात. एक म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याज दर मिळतो. वाढीव व्याजामुळे योजनेची मुदत संपल्यानंतर एक मोठी रक्कम तुमच्या हातात येते. ज्या रकमेचा उपयोग तुम्ही मुलाच्या शिक्षसाठी, मुलीच्या लग्नासाठी करू शकता. दुसरं म्हणजे पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे हे सुरक्षीत असतात. जर समजा एखादी बँक दिवाळखोरीत (Bank Default) निघाली, किंवा तिच्यावर भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध आणले तर तुम्हाला सरकारी नियमाप्रमाणे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीपैकी (Investment) फक्त पाच लाख रुपयेच मिळतात. मात्र पोस्टाच्या योजनेमध्ये असे होत नाही. पोस्टाच्या योजनेमध्ये तुम्हाला संपूर्ण परतावा मिळतो, तो देखील व्याजासह तेव्हा आज आपण पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तिचे नाव आहे, मंथली इनकम स्कीम (MIS) या योजनेत मिळणारा व्याजदर. गुंतवणुकीची मर्यादा कालावधी याबाबत माहिती घेऊयात.

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम अंतर्गंत केलेल्या गुंतवणुकीवर सध्या वार्षिक आधारावर 6.6 टक्के व्याज दर आहे. या योजनेत दर महिन्याला तुमच्या खात्यात व्याज जमा होते. दिनांक एक एप्रिल 2020 पासून व्याजात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गुंतवणुकीची मर्यादा

पोस्ट ऑफीसच्या या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी एक हाजारांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही पोस्टाच्या या योजनेत जास्तीत जास्त 4.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जॉइंट खाते असल्यास जास्तीत जास्त 9 लाखांपर्यंतची गुंतवणूक करता येते. तुम्हाला या योजनेत हजार रुपयांच्या पटीमध्ये गुंतवणूक करता येते, तसेच जॉइंट खाते ओपन करून देखील या योजनेचा लाभ घेता येतो. जॉइंट खाते ओपन केल्यास संबंधित दोनही खातेदारांचा रकमेवर समान अधिकार असतो.

खाते कोणाला सुरू करता येते

पोस्टाच्या या स्मॉल सेविंग्स योजनेचा लाभ कोणताही प्रौढ भारतीय व्यक्ती घेऊ शकतो. तसेच अल्पवयीन मुले देखील आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेंतर्गंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ज्यांचे दहा वर्षांच्या पुढे वय आहे, अशा कोणालाही आपल्या स्व:ताच्या नावाने खाते ओपन करता येते. या योजनेत इत योजनांपेक्षा अधिक व्याज मिळत असल्याने गुंतवणूक वाढल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Petrol diesel price : कच्च्या तेलाचे दर वाढले ; इंधनाच्या दरात कोणतीही वाढ नाही, सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

Health Care Tips : बेलाच्या फळाचा ज्यूस आरोग्यासाठी वरदानच, जाणून घ्या 5 मोठे फायदे!

Aurangabad | शहरातील मोबाइल टॉवरची वसुली आता खासगी एजन्सीकडे,  सर्वेक्षण आणि वसुलीचे काम लवकरच

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें