Secure investment : जेवढी रिस्क तेवढा अधिक परतावा; गुंतवणुकीचा कोणता मार्ग सुरक्षीत? जाणून घ्या

गोष्ट जेव्हा गुंतवणुकीची (investment) येते तेव्हा अनेक जण बचत केलेल्या पैशांच्या गुंतवणुकीसाठी सेफ (Secure investment) मार्ग निवडतात. ज्यामध्ये बँकेच्या (bank) आणि पोस्टाच्या विविध योजनांचा समावेश होतो.

Secure investment : जेवढी रिस्क तेवढा अधिक परतावा; गुंतवणुकीचा कोणता मार्ग सुरक्षीत? जाणून घ्या
सरकार तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे ! सावध व्हा, तुमची फसवणूक होतेय....Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 10:47 AM

गोष्ट जेव्हा गुंतवणुकीची (investment) येते तेव्हा अनेक जण बचत केलेल्या पैशांच्या गुंतवणुकीसाठी सेफ (Secure investment) मार्ग निवडतात. ज्यामध्ये बँकेच्या (bank) आणि पोस्टाच्या विविध योजनांचा समावेश होतो. अनेक जण आपल्या पैशांची एफडी करण्यास प्राधान्य देतात. तर अनेक जण इंडिया पोस्ट पेमेंट बँकांच्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. सामान्यपणे हे सर्व गुंतवणुकीचे सेफ मार्ग मानले जातात. या गुंवणुकीमध्ये रिक्स कमी असते. म्हणजे तुमचे पैसे कधीही बुडत नाहीत. मात्र त्यावर व्याज देखील मर्यादीत स्वरुपातच मिळत असल्याने हाती येणारा परतावा देखील मर्यादीत असतो. परताव्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ वाट पहावी लागते. मात्र ज्या गुंतवणुकीमध्ये रिस्क असते त्या गुंतवणुकीमधून तुम्हाला हमखास जास्त परतावा मिळतो ते देखील अल्पकालावधीत, मात्र अशा ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमध्ये पैसे बुडण्याची देखील तितकीच भीती असते. अशा परिस्थितीमध्ये कुठली गुंतवणूक तुम्हाला योग्य ठरू शकते हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमचा कोणत्या वयोगटामध्ये समावेश होतो

गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट आवश्य लक्षात घ्या की तुम्ही नेमके कोणत्या वयोगटात मोडता. जर तुमचे वय हे 45 वर्षांपेक्षा अधिक असेल तर अशावेळी तुम्ही सेफ गुंतवणुकीला म्हणजे ज्यात रिस्क नाही अशा योजनेत गुंतवणुकीला प्राधान्य द्या. कारण तुम्ही त्यावेळी वयाच्या अशा टप्प्यावर असता जिथे तुमची रिटायरमेंट जवळ आलेली असते. अशावेळी तुम्ही जर अधिक चांगल्या परताव्याच्या आमिषाने रिस्क असलेल्या ठिकाणी जसे शेअर मार्केट, म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आणि तुमचे पैसे बुडाले तर बुडालेले पैसे तुम्ही पुन्हा कव्हर करू शकता याची खात्री नसते. तुमच्या जवळ असलेली बचत बुडाल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर अडचन येऊ शकते. पण जर तुमचे वय हे 45 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही गुंतवणुकीमध्ये रिस्क घेऊ शकता. तुम्हाला अधिक परतावा देखील मिळेल. सोबतच जरी तुमची बचत बुडाली तर तुम्ही पुन्हा एकदा पैसे उभारू शकता.

गुतंवणुकीपूर्वी अभ्यास करा

गुंतवणुकीपूर्वी तुम्ही विविध योजनांचा अभ्यास करा, कोणत्या योजनांमध्ये अधिक फायदा आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवयाचा असेल तर थेट न गुंतवता आधी शेअर मार्केटचा अभ्यास करा. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या आणि नंतरच पैसे गुंतवा असे केल्यास तुम्हाला निश्चितपणे चांगला परतावा मिळू शकतो. किंवा तुम्हाला जर बँकेतील एखादी योजना चांगली वाटत असेल, बँकेकडून तुमच्या गुंतवणुकीवर तगडा इटरेस्ट रेट मिळत असेल तर तुम्ही बँकेच्या त्या योजनेत देखील पैसे गुंतवू शकता.

संबंधित बातम्या

Bank of Baroda देतीये स्वस्तात घर खरेदीची संधी; 24 मार्चला बँकेकडून गहान संपत्तीचा लिलाव

जपानी कंपनी Suzuki Motor भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना

अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.