AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीत दुहेरी फायदा, कर बचतीसह जास्त परतावा मिळण्याची हमी

कर वाचवू पाहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी जीवन विमा योजना टाळाव्यात कारण त्यांना या वयात कोणत्याही विम्याची आवश्यकता नसते. कारण त्यांच्यावर शक्यतो कोणती जबाबदारी उरलेली नसते. त्यामुळे त्यांचे लक्ष केवळ नियमित उत्पन्न आणि भांडवली संरक्षणावर असावे. | senior citizen

ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीत दुहेरी फायदा, कर बचतीसह जास्त परतावा मिळण्याची हमी
ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 06, 2021 | 6:47 AM
Share

मुंबई: ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा गुंतवणूक करताना त्यांच्या नेमक्या गरजा पूर्ण करणारी आर्थिक योजना शोधण्यात अडचणी येतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक एखाद्या चुकीच्या योजनेत गुंतवणूक करुन बसतात आणि या गुंतवणुकीचा म्हणावा तसा फायदा होत नाही. अनेकदा एजंट अधिक कमिशन मिळवण्यासाठी चुकीची उत्पादने सुचवतात. जसे एंडॉमेंट विमा योजना आणि सिंगल प्रीमियम गॅरंटीड रिटर्न योजना.

कर वाचवू पाहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी जीवन विमा योजना टाळाव्यात कारण त्यांना या वयात कोणत्याही विम्याची आवश्यकता नसते. कारण त्यांच्यावर शक्यतो कोणती जबाबदारी उरलेली नसते. त्यामुळे त्यांचे लक्ष केवळ नियमित उत्पन्न आणि भांडवली संरक्षणावर असावे. काही योजना ज्येष्ठ नागरिकांना कर वाचवण्यास आणि त्यांच्या गुंतवणूकीतून तुलनेने जास्त परतावा मिळवण्यास मदत करू शकतात.

सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS)

ही एक सरकार पुरस्कृत योजना आहे जी ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरण आणि आर्थिक सुरक्षेसाठी तयार केली गेली आहे. यामध्ये दरवर्षी 7.40 टक्के व्याज मिळते. जे ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या इतर कोणत्याही नियमित योजनांतील परताव्यापेक्षा जास्त आहे. हे खाते वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे आपल्या जोडीदारासह उघडता येते. नामांकनासाठी खाते उघडण्याची पूर्व आणि पोस्ट सुविधा उपलब्ध आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतील आणि किमान रक्कम जमा केली जाऊ शकते. SCSS अंतर्गत मिळणारे व्याज तिमाही आधारावर देय आहे. ही योजना खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी मॅच्युअर होते. तुम्ही हा कालावधी आणखी तीन वर्षांनी वाढवू शकता.

पंचवार्षिक टॅक्स सेव्हर बँक फिक्स्ड डिपॉझिट

कर बचत होणाऱ्या या मुदत ठेव योजनेत परतावाही चांगला मिळतो. बँका सहसा ज्येष्ठ नागरिकांना कर बचत FD वर 50 बेसिस पॉइंट जास्त व्याज दर देतात. तथापि, ठेवीच्या तारखेपासून किमान 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कर बचत एफडीमधून पैसे काढले जाऊ शकत नाहीत. कर वाचवणाऱ्या FD मध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. कर बचत FD चे व्याज दर बँकेनुसार बदलतात. सेवानिवृत्त व्यक्तीला त्याच्या तरलता आवश्यकतांनुसार त्रैमासिक व्याज देय पर्याय किंवा मासिक व्याज देयक पर्याय निवडण्याचा पर्याय असतो. वरील दोन्ही योजनांवर मिळणारे व्याज करपात्र आहे, परंतु बँक ठेवींवर वार्षिक 50,000 रुपयांपर्यंत मिळणारे व्याज कलम 80TTB च्या तरतुदीनुसार आयकरातून मुक्त आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!