AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC IPO Open Today: प्रतिक्षा संपली, सर्वात मोठा IPO लाँच होणार, एलआयसीत नेमके किती पैसा लावावे लागणार?

एलआयसी आयपीओचा मूल्य संचय (Price Band) 902 ते 949 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला असून, कमीत कमी 15 शेअर्सचा गुंतवणुकदाराला खरेदी करावे लागतील. विमा धारकाच्या कोट्यातून आयपीओमध्ये अर्ज केल्यास तुम्हाला एका खंडासाठी (Lot) एकूण 13,335 रुपये गुंतवावे लागतील.

LIC IPO Open Today: प्रतिक्षा संपली, सर्वात मोठा IPO लाँच होणार, एलआयसीत नेमके किती पैसा लावावे लागणार?
आता किराणा दुकानांतून सहजपणे एलआयसी आयपीओत करा गुंतवणूकImage Credit source: tv9
| Updated on: May 04, 2022 | 10:29 AM
Share

LIC IPO Open Today: एलआयसी आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याची एकदाची प्रतिक्षा संपली. आजपासून किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investor) देशातील सर्वात मोठ्या एलआयसी आयपीओसाठी (LIC IPO) अर्ज करू शकणार आहेत. एलआयसीचा आयपीओ 4 मे ते 9 मे या कालावधीत सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला आहे. या कालावधी दरम्यान गुंतवणुकदार या आयपीओमध्ये गुंतवणूक करु शकतील. भारतातील विमा उद्योगाचा विकासदर 17 टक्के, तर एलआयसीचा विकासदर 7 टक्के आहे. मात्र अनाधिकृत बाजारात त्याचा प्रिमियम 85 रुपये आहे. म्हणजेच 949 रुपयांचा शेअर, 1,034 रुपयांवर व्यापार करत आहे. प्रतिष्ठित आणि मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकदारांनी 2 मे रोजी एलआयीसीच्या आयपीओत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एलआयसीच्या आयपीओमध्ये विमाधारक (Policyholders), एलआयसी कर्मचारी (LIC Employees) आणि सामान्य गुंतवणूकदार (General Investor) अशा तीन श्रेणी निर्धारित करण्यात आल्या आहेत. या आयपीओमध्ये अर्ज केल्यावर किती पैसे गुंतवावे (Investment) लागतील, असे आणि इतर अनेक प्रश्न अर्ज करण्यापूर्वी सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात असतील. तसेच, त्यांना किती शेअर्स मिळण्याची शक्यता आहे? हे ही माहिती करुन घ्यायचे असेल. तर जाणून घेऊया, या सर्व प्रश्नांची उत्तरे.

जर तुम्ही एलआयसीची पॉलिसी घेतली असेल, म्हणजेच तुम्ही एलआयसी विमाधारक असाल तर तुम्हाला आयपीओमध्ये आरक्षणासह सवलतीचा लाभ मिळेल.एलआयसी विमा धारकाला या आयपीओमध्ये 10 टक्के राखीव जागा आहेत. तर विमाधारकाला आयपीओमध्ये प्रति शेअर रुपयांची सवलत मिळेल.

तुम्ही एलआयसी विमाधारक असाल तर आयपीओमध्ये तुम्हाला किती पैसे गुंतवावे लागतील हे माहिती करुन घेऊयात. एलआयसी आयपीओचा मूल्य संचय (Price Band) 902 ते 949 रुपयांच्या दरम्यान आहे,आणि 15 शेअर्सचा एक खंड (Lot) आहे. प्रति शेअर 949 रुपये किंमत निश्चित धरली आणि 60 रुपये प्रति शेअर सवलत गृहीत धरली तर विमाधारकाला या मूल्य संचयानुसार (949-60= 889 x 15=13,335) म्हणजेच एकूण 13,335 रुपये मोजावे लागतील. याचा दुसरा अर्थ असा की, विमाधारकाला एक लॉट आयपीओसाठी 900 रुपयांची सवलत मिळेल.

एलआयसी कर्मचाऱ्यांनाही सूट .

त्याचबरोबर एलआयसी कर्मचाऱ्यांना या आयपीओमध्ये अर्ज केल्यावर प्रति शेअर 45 रुपयांची सूट मिळणार आहे. म्हणजेच अप्पर प्राइस बँडनुसार त्यांना एका लॉटच्या अर्जावर 13,560 रुपये द्यावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचारी एका लॉट अर्जांवर 675 रुपयांची बचत करु शकतील. जर तुम्ही एलआयसी विमाधारक आणि कर्मचारी असाल तर तुम्हाला वरच्या किंमतीच्या बँडनुसार 14,235 रुपये द्यावे लागतील. आयपीओचा इश्यू साइज 21,000 कोटी रुपये असून आयपीओच्या माध्यमातून जवळपास 22.14 कोटी शेअर्सची विक्री होणार आहे.

एलआयसी आयपीओमध्ये अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही आयपीओसाठी अर्ज करता, तेव्हा किरकोळ गुंतवणुकदार म्हणून तुम्हाला या प्रकारात तीन पर्याय मिळतील, ते योग्य प्रकारे निवडा.

1. नवीन

2. विमाधारक

3. कर्मचारी

पहिला पर्याय

तुम्ही एलआयसीचे विमाधारक असाल तर विमाधारक श्रेणी निवडा. ही श्रेणी निवडून तुम्हाला एलआयसी आयपीओमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. याशिवाय विमाधारकांसाठी आयपीओमध्ये प्रति शेअर 60 रुपयांची सवलत मिळणार आहे.

दुसरा पर्याय

त्याचबरोबर तुम्ही एलआयसीचे कर्मचारी असाल तर तुम्हाला एम्प्लॉई कॅटेगरीवर क्लिक करावं लागेल. एलआयसी कर्मचाऱ्यांना या आयपीओसाठी अर्ज केल्यावर प्रति शेअर 45 रुपयांची सूट मिळणार आहे.

तिसरा पर्याय

जर तुम्ही एलआयसी विमाधारक नसाल, किंवा तुम्ही एलआयसीचे कर्मचारी नसाल, तर तुम्हाला जनरल कॅटेगरी म्हणजेच नवीन निवडावी लागेल, या कॅटेगरीमध्ये अर्ज केल्यास तुम्हाला जास्त आयपीओसाठी अप्पर प्राइस बँडनुसार एकूण 14,235 रुपये मोजावे लागतील.

या आयपीओच्या माध्यमातून सरकार आपला 3.5 टक्के हिस्सा विकून 21 हजार कोटी रुपये उभारणार आहे. अशात हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65 हजार कोटी रुपये जमा केले आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.