LIC IPO : गुंतवणुकीची अप्रतिम संधी, किरकोळ गुंतवणुकदार एकाचवेळी दोन सवलतींपासून मात्र वंचित

भारतातील विमा उद्योगाचा विकासदर 17 टक्के, तर एलआयसीचा विकासदर 7 टक्के आहे. मात्र अनाधिकृत बाजारात त्याचा प्रिमियम 85 रुपये आहे. म्हणजेच 949 रुपयांचा शेअर, 1,034 रुपयांवर व्यापार करत आहे. प्रतिष्ठित आणि मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकदारांनी 2 मे रोजी एलआयीसीच्या आयपीओत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.

LIC IPO : गुंतवणुकीची अप्रतिम संधी,  किरकोळ गुंतवणुकदार एकाचवेळी दोन सवलतींपासून मात्र वंचित
LIC IPO साठी रविवारी खुल्या राहणार बॅंकImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 8:42 AM

भारतातील विमा उद्योगाचा (Insurance Industry) विकासदर (Growth rate) 17 टक्के, तर एलआयसीचा विकासदर 7 टक्के आहे. मात्र अनाधिकृत बाजारात त्याचा प्रिमियम 85 रुपये आहे. म्हणजेच 949 रुपयांचा शेअर, 1,034 रुपयांवर व्यापार करत आहे. देशभरातील प्रतिष्ठित आणि मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकदारांनी (Anchor Investor) 2 मे रोजी एलआयीसीच्या आयपीओत (LIC IPO) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. आता आज बुधवारपासून देशातील सर्वात मोठा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investor) खुला होत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) आयपीओमध्ये 9 मेपर्यंत विमाधारक (Policy Holder) आणि किरकोळ गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.किमान 15 शेअर्सच्या खंडात प्रत्येक शेअरसाठी 902-949 रुपयांचे गुतंवणूक उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. या आयपीओमध्ये दोन सूट देण्यात आली आहे. एक पॉलिसीधारकांसाठी आणि दुसरा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी. पॉलिसीधारकांना 60 रुपये तर किरकोळ गुंतवणूकदाराला 45 रुपये सवलत मिळणार आहे. पण एकाच वेळी दोन सवलतींचा लाभ मिळणार नाही.

विमाधारक असाल तर ही संधी

जर तुम्हाला विमाधारकाच्या कोट्यातून सवलत हवी असेल तर 13 फेब्रुवारीपूर्वी भारतीय आयुर्विमा महामंडळीची एक विमा पॉलिसी तुम्ही खरेदी करणे अनिवार्य आहे आणि विशेष म्हणजे ती सध्यस्थितीत सुरु असावी, पॉलिसी बंद नसावी. त्यानंतर 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचं पॅन कार्ड या पॉलिसीशी जोडलं गेलं पाहिजे. पॉलिसीधारक अल्पवयीन असेल तर त्याच्या नावावर डिमॅट खाते असावे.विमा क्षेत्रात भारतात अपार गुंतवणुकीच्या संधी आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, ही संधी  पाहून गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, असे रेलिगेअर ब्रोकिंग यांनी सल्ला दिला. या संस्थेच्या अंदाजानुसार 2021-32 मध्ये विमा उद्योगाची वाढ 14-16 टक्के चक्रवाढ दराने होणार आहे. मात्र, त्याच्या बाजारातील जोखमीबाबत नक्कीच चिंता आहे.

विमा कंपनीच्या हिस्सेदारीबाबत चिंता

एंजल वनने म्हटले आहे की एलआयसीचे मूल्यांकन एम्बेडेड मूल्याच्या केवळ 1.1 पट आहे. सूचीबद्ध असलेल्या खासगी कंपन्या 2.5 ते 4.3 पट व्यापार करत आहेत. मात्र, वैयक्तिक विमा व्यवसायात एलआयसीचा बाजारपेठेतील हिस्सा निश्चितच चिंतेचा विषय आहे. असं असलं तरी गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवायलाच हवेत.

खासगी कंपन्यांपेक्षा स्वस्त भाव

रिलायन्स सिक्युरिटीजने म्हटले आहे की, आयपीओ सूचीबद्ध खासगी विमा कंपन्यांपेक्षा कमी किंमतीत आहे. याने विम्याच्या पोर्ट फोलिओमध्ये विविधता आणली आहे. 14 लाख एजंटसह त्याचा आर्थिक रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे यातील गुंतवणूक फायद्याची राहील. ब्रोकरेज हाऊस निर्मल बंग सिक्युरिटीजचेही म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी करावेत. जर कंपनीने नवीन उत्पादने सादर केली तर त्याचा बाजारातील हिस्सा आणखी मजबूत होईल असे या कंपनीचे मत आहे.

एक नजर एलआयसीच्या व्यवसायावर

एलआयसीची सर्वात मोठी नकारात्मक बाजू म्हणजे सलग 8 वर्षांपासून त्याचा बाजारातील हिस्सा कमी होत आहे. तो 72 टक्क्यांवरून 64 टक्क्यांवर आला आहे. भारतातील विमा उद्योगाचा विकासदर 17 टक्के, तर एलआयसीचा विकासदर 7 टक्के आहे. मात्र अनाधिकृत बाजारात त्याचा प्रिमियम 85 रुपये आहे. म्हणजेच 949 रुपयांचा शेअर, 1,034 रुपयांवर व्यापार करत आहे. प्रतिष्ठित आणि मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकदारांनी 2 मे रोजी एलआयीसीच्या आयपीओत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. यात देश-विदेशातील २० अँकर गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....