Old Pension Scheme : ठरलं एकदाचं! जुन्या पेन्शन योजनेविषयी राज्य सरकारचा झाला निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेवरुन वादविवाद सुरु असताना राज्य सरकारने ही भूमिका घेतली आहे..

Old Pension Scheme : ठरलं एकदाचं! जुन्या पेन्शन योजनेविषयी राज्य सरकारचा झाला निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
सरकारने घेतला निर्णयImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 11:24 PM

नवी दिल्ली : जुन्या पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) देशभरात वाद-विवाद सुरु आहे. एवढंच नाही तर त्यावरुन राजकारणही रंगलं आहे. काँग्रेसशासित (Congress) राज्य सरकारांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारीही बिथरले आहेत. कर्मचारी (Employees) जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही आहेत. तर काही राज्य सरकारे आणि केंद्र सरकारने मात्र या योजनेला नकारघंटा वाजवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

प्रत्येक राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आग्रही आहेत. कर्मचारी संघटना सरकारवर दबाव आणत आहेत. केंद्रीय कर्मचारी पण जुन्या पेन्शन योजनेसाठी लढा देत आहेत.काही संघटनांनी न्यायपालिकेचा (Court) दरवाजा ही ठोठावला आहे.

हे सुद्धा वाचा

तर काही राज्य सरकारांनी (State Government) कर्मचाऱ्यांचा रोष नको म्हणून जुनी पेन्शन योजना लागू ही केली आहे. यामध्ये काँग्रेसशासित राज्यांचा सहभाग आहे. तर केंद्र सरकारने जुन्या पेन्शन योजनेला विरोध केला आहे.

महाराष्ट्रात या योजनेविषयीही मते-मतांतरे आहेत. कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही आहेत. कर्मचाऱ्यांच्या संघटनांचाही राज्य सरकारवर दबाव होता. पण राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरल हँडलवरुन याविषयीची माहिती दिली आहे.

यापूर्वी 15 व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह (15th Finance Commission Chairman NK Singh) यांनी नवीन पेन्शन योजनेची (New Pension Scheme) वकिली केली आहे. जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी राज्याच्या तिजोरीसाठी हाणीकारक असल्याचा दावा त्यांनी केला होता.

राज्य जुनी पेन्शन योजना लागू करुन आर्थिक संकट ओढावून घेत असल्याचा आरोप सिंह यांनी केला. या योजना अनेक राज्यांची आर्थिक घडी विस्कटून टाकेल, असा इशारा ही त्यांनी दिला. नवीन पेन्शन योजनेत ठोस आर्थिक तर्क आहेत. त्यावर अनेकदा वाद झाले, चर्चा झाली, अनेकदा खल झाले, त्यानंतर नवीन योजना आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांनी नवीन पेन्शन योजनेऐवजी जुन्या पेन्शन योजनेचा हात धरला आहे. त्याच मार्गावर पंजाब राज्य जाणार आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. लवकरच पंजाब या राज्यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.