आधार कार्डवरचा फोटो बदलायचाय, अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया; जाणून घ्या नेमके काय करावे लागेल

फोटो बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरवर (आधार नोंदणी केंद्र) जावे लागेल. आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलण्याकरीता तुम्हाला किरकोळ शुल्क द्यावे लागेल.

आधार कार्डवरचा फोटो बदलायचाय, अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया; जाणून घ्या नेमके काय करावे लागेल
TAFCOP च्या मते, या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम दिले आहेत हे सहजपणे शोधू शकता.
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 5:13 PM

नवी दिल्ली : खूप कमी लोक आहेत, ज्यांना आपल्या आधार कार्डवरचा फोटो मनापासून आवडतो. काही वर्षांपूर्वी आधार कार्डसाठी काढलेला फोटो अनेकांना पसंत नाही. त्यामुळे अनेकजण आधार कार्डवरच्या स्वतःच्या फोटोवर तक्रारीचा सूर आळवत आहेत. अशा लोकांना आधार कार्डवरचा जुना फोटो बदलून त्या ठिकाणी आपला नवीन फोटो ठेवता शकेल. हे काम अधिक वेळखाऊ नाही. बस्स.. अवघ्या पाच मिनिटांमध्ये तुम्ही हे काम करू शकाल. मात्र हे काम करण्याआधी एकदा तुम्ही याबाबतची प्रक्रिया जाणून घ्या. अनेकांना आपल्या आधार कार्डवर त्यांचा छानसा स्टायलिश फोटो ठेवण्याची इच्छा आहे. पण आधार कार्डवर स्टायलिश फोटो लावण्यास मनाई आहे. (To change the photo on Aadhar card, complete the process in just five minutes; Find out exactly what needs to be done)

फोटो कसा बदलू शकतो?

फोटो बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरवर (आधार नोंदणी केंद्र) जावे लागेल. आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलण्याकरीता तुम्हाला किरकोळ शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क भरल्यानंतर आधार नोंदणी केंद्रावर बसलेले प्रतिनिधी तुमचा नवीन फोटो क्लिक करतील व तो फोटो तुमच्या आधार कार्डसाठी वापरला जाईल. तुम्ही आधार नोंदणी केंद्रावर जाणे व तेथेच फोटो क्लिक करणे अनिवार्य आहे. आधार कार्डमध्ये फोटो अपडेट करणार्‍या मुलांसाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यक नसते.

काय आहे पूर्ण प्रक्रिया?

सर्वात प्रथम यासंदर्भातील एक फॉर्म भरा. नंतर यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. तेथे फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा. या अर्जामध्ये तुम्ही स्वतःची माहिती भरा. त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा आणि तेथे बसलेल्या प्रतिनिधींना तुमचा फॉर्म द्या. तुम्हाला तुमचा बायोमेट्रिक तपशीलही सांगावा लागेल. त्यानंतर आधार केंद्र प्रतिनिधी तुमचा फोटोग्राफ घेईल. एक बाब लक्षात ठेवा की आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावरच जावे लागणार आहे. यासाठी कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया नाही.

स्टायलिश फोटोला मनाई

अनेक लोकांना आपल्या आधार कार्डवर स्टायलिश फोटो असावा, असे वाटते. पण या लोकांची ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. कारण आधार कार्डवर स्टायलिश फोटो ठेवण्यास मनाई आहे. यासाठीच तुम्हाला तुमचा फोटो क्लिक करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर जावे लागते. तेथे बसलेले प्रतिनिधीच तुमचा फोटो क्लिक करतील व तोच फोटो तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर अपडेट करता येऊ शकेल. (To change the photo on Aadhar card, complete the process in just five minutes; Find out exactly what needs to be done)

इतर बातम्या

मोठी बातमी ! 4 कोटी नव्हे तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा अनिल देशमुखांना मोठा दणका

पंतप्रधान मोदी-पवार भेट बँकिंग क्षेत्राच्या प्रश्नाबाबत, भेटीबाबत काँग्रेस, मुख्यमंत्र्यांनाही कल्पना, राष्ट्रवादीकडून स्पष्ट

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.