AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI New Facilit : क्रेडिट नसेल तरी ऑनलाईन घेता येणार उधार, कसं ते जाणून घ्या!

तुम्ही आत्तापर्यंत शॉपिंग करताना लगेच पेमेंट केलं असेल. पण आता तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग ही उधारीवरही करता येणार आहे.

UPI New Facilit : क्रेडिट नसेल तरी ऑनलाईन घेता येणार उधार, कसं ते जाणून घ्या!
| Updated on: Apr 07, 2023 | 9:00 PM
Share

मुंबई : सध्याच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजकाल कोणतीही वस्तू घ्यायचं म्हटलं की प्रत्येकजण ऑनलाइन शॉपिंग किंवा ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देतात. तर अशाच ऑनलाइन शॉपिंग प्रेमींसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्ही आत्तापर्यंत शॉपिंग करताना लगेच पेमेंट केलं असेल. पण आता तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग ही उधारीवरही करता येणार आहे.

आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करताना क्रेडिट कार्डचा वापर केला असेल. पण आता तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज पडणार नसून तुम्ही क्रेडिट लाइन वापरू शकता. येत्या काही दिवसांत तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर न करता क्रेडिट लाइन वापराल.  ही एक नवीन प्रणाली असून, जी क्रेडिट कार्डसारखी असणार आहे.

केंद्रीय बँकेने सांगितलं आहे की, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) देशातील सर्व बँकांच्या पूर्व-मंजूर क्रेडिट लाइनशी जोडले जाईल. तसंच नवीन UPI ​​नियम लागू झाल्यामुळे, आता ग्राहक उधारीवर खरेदी करण्यासाठी आणि नंतर पैसे भरण्यासाठी UPI वापरू शकतील, जसे की डिजिटल क्रेडिट लाइन.

ग्राहकांना मिळणारे फायदे

आता ग्राहकांना वेगळे कार्ड बाळगावे लागणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरून UPI ​​द्वारे पेमेंट करू शकणार आहात.

या नवीन प्रणालीमुळे तुमच्या वेळेचीही बचत होणार आहे.  तसंच क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण अप्रूव्ह झाल्यानंतर लगेच क्रेडिट लाइन उपलब्ध होईल.

पॉइंट-ऑफ-परचेस क्रेडिट एक्सपीरियंस कोणत्याही अडथळ्याशिवाय असेल.  यामुळे BNPL क्षेत्रात जलद वाढ होऊ शकते.

UPI सह देशात डिजिटल पेमेंट वेगाने वाढले

UPI 2016 मध्ये लाँच झाल्यामुळे डिजिटल पेमेंटच्या जगात क्रांती झाली. ग्राहकांना  UPI ने थेट  बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली. सिंगापूर मधील पेनाऊ ही असोसिएशन ऑफ बँकॅने विकसित केलेली UPI सारखीच पेमेंट प्रणाली आहे.  RBI कडे भारतात RTGS आणि NEFT पेमेंट सिस्टीम कार्यरत आहे. तसंच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) IMPS, RuPay, UPI सारख्या प्रणाली चालवते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.