तुम्हाला जर एखाद्याला पैसे संड करायचे आहेत, तर त्याच्या खात्याशी संबंधित सर्व डिटेलस दोनदा चेक करा. जसे की, त्याचा खाते नंबर, आयएफसी कोड, जर तो एखादे युपीआय अॅप वापरत असेल तर त्याचा फोन नंबर इत्यादी. त्यामुळे चुकीच्या खात्यावर पैसे सेंड होण्याचा धोका जवळपास 99 टक्के कमी होतो. समजा तुम्ही जर चुकीचा खाते नंबर टाईप केला आणि तो कोणाचाच खाते नंबर नसेल तर आरबीआयच्या नियमानुसार ती सर्व रक्कम तुम्हाला परत मिळते.
समजा तुम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करत आहात आणि नजर चुकीने ते जर दुसऱ्या खात्यावर सेंड झाले तर काय करावे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. खरतर पैशांच्या व्यवहारामध्ये संबंधित बँकांनी ग्राहकाचे नाव आणि त्याचा खाते नंबर जुळून पहावा, तो जर जुळत असेल तरच पैशांच्या व्यवहारांना परवानगी द्यावी. अशी अपेक्षा आरबीआयला बँकांकडून आहे. मात्र तरी देखील तुमची रक्कम चुकीने दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाल्यास ती तुम्हाला मिळेल की नाही, हे सर्व त्या व्यक्तीच्या व्यवहारावर अवलंबून असते.
जर तुमच्याकडून चुकीच्या खात्यावर पैसे जमा झाले असतील तर सर्व प्राथम तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधा. त्यांना संबंधित घटनेची सविस्तर माहिती द्या. त्यानंतर तुम्ही ज्या ग्राहकांच्या खात्यावर चुकीने पैसे ट्रान्सफर केले असतील तो जर तुमच्याच ब्रँचचा ग्राहक असेल तर बँक त्याला बोलावून घेऊ शकते. तसेच पैसे परत तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची विनंती करते. समजा तो जर ग्राहक हा इतर कुठल्या बँकेचा असेल, तर संबंधित ग्राहकाच्या होम ब्रँचशी तुम्हाला त्यासाठी संपर्क साधावा लागेल. मात्र या ठिकाणी एक गोष्ट आवश्य लक्षात ठेवावी की, तुम्हाला तुमचे पैसे वापस मिळणार की नाही? हे सर्व संबंधित व्यक्तीच्या व्यवहारावरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्याच्याशी संवाद साधताना तो काळजीपूर्वक साधल्या जावा.
आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट
Public Provident Fund: गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न
असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं