AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Public Provident Fund: गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न

बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडले जाऊ शकते. पीपीएफमध्ये एका वित्तीय वर्षात किमान 500 आणि कमाल 1.5 लाखांची गुंतवणूक केली जाऊ शकते. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असतो. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केले जाऊ शकत नाही.

Public Provident Fund: गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न
pm jandhan account
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 8:23 PM
Share

नवी दिल्ली- दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) खात्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. पीपीएफची गणना छोट्या गुंतवणुक योजनांमध्ये केली जाते. जानेवारी-मार्च तिमाहीत वार्षिक 7.1 टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. वर्ष 2021 मिळणाऱ्या व्याजदर सापेक्ष पीपीएफवरील व्याजदर स्थिर आहे. पीपीएफ ही भारतातील लोकप्रिय बचत योजनांपैकी प्रमुख योजना आहे. केंद्र सरकारच्या कक्षेतील योजना असल्याने गुंतवणुकीचे सुरक्षित आणि विश्वासार्ह साधन मानले जाते. (public provident fund investment most safe and reliable get 7.1% return) 

किमान व कमाल ठेव-

बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडले जाऊ शकते. पीपीएफमध्ये एका वित्तीय वर्षात किमान 500 आणि कमाल 1.5 लाखांची गुंतवणूक केली जाऊ शकते. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असतो. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केले जाऊ शकत नाही. मात्र, काही विशेष परिस्थिती यासाठी अपवाद ठरू शकतात. पीपीएफ नियमात वर्ष 2016 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. आपत्कालीन वैद्यकीय स्थिती, मुलांचे उच्च शिक्षण आदी कारणांसाठी वेळेपूर्वीच खाते बंद केले जाऊ शकते.

PPF (पीपीएफ) दृष्टीक्षेपात:

o योजनेचे नाव- सामाजिक भविष्य निर्वाह निधी o परतावा दर(वार्षिक) – 7.1% o लॉक-इन कालावधी- 15 वर्षे o किमान गुंतवणूक (प्रति वर्ष)- 500 रुपये o कमाल गुंतवणूक (प्रति वर्ष)- 1.5 लाख रुपये o कर लाभ- कलम 80 –सी अंतर्गत गुंतवणूक कर पात्र

PPF खाते कुणासाठी?

PPF खाते (Public Provident Fund Account) उघडण्यासाठी भारतीय नागरीक असण्याची प्राथमिक अट आहे. अल्पवयीन बालकाच्या नावे देखील खाते उघडले जाऊ शकते. मात्र, PPF खात्यात संयुक्त खात्याची तरतूद नाही. मात्र, अन्य कुणाला खात्यासाठी नामनिर्देशित केले जाऊ शकते. कुणीही व्यक्ती आपल्या नावावर एकाधिक खाते उघडू शकत नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस किंवा बँक यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. PPF खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे o PPF खाते उघडण्याचा फॉर्म o तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो o ओळखपत्र ( कोणतेही वैध ओळखपत्र जसे पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड ) o पत्त्याचा पुरावा ( कोणताही निवास पुरावा. पासपोर्ट / वीज बिल / रेशन कार्ड / बँक पासबुक )

संबंधित बातम्या:

Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं साडे दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले?, आगार प्रमुखांकडून रुजू करुन घेण्यास नकार! Breaking : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण! मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

(public provident fund investment most safe and reliable get 7.1% return) 

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.