AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan : काय सांगता, कर्ज झटपट फेडले तरी भरावा लागतो दंड! हा आहे उपाय

Loan : तुम्ही वेळेपूर्वी कर्ज फेडण्याची तयारी करत असाल तर हा निर्णय चुकीचा पण ठरु शकतो. त्यामुळे तुम्हाला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागू शकतो. कर्ज घेताना अत्यंत लहान अक्षरात लिहिलेल्या अटी व शर्ती आपण नीट पणे वाचत नाहीत, त्याचा असा फटका बसतो.

Loan : काय सांगता, कर्ज झटपट फेडले तरी भरावा लागतो दंड! हा आहे उपाय
| Updated on: Aug 17, 2023 | 5:26 PM
Share

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : घरी खरेदी करताना, कार खरेदीवेळी अथवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा खर्च येतो. त्यासाठी कर्ज घेणे (Loan) ही सामान्य बाब झाली आहे. पण कर्ज घेतल्यानंतर अनेक वर्ष कर्ज फेडण्याची झंझट मागे लागते. पगारातील एक मोठा भाग हप्ता चुकता करण्यासाठी खर्ची पडतो. अनेक जण झटपट कर्ज फेडीसाठी ना ना दिव्य करतात. व्याजाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आणि हप्ता कमी होण्यासाठी काहींचा प्रयत्न असतो. पण EMI थकल्यावर जसा दंड द्यावा लागतो, तसेच लवकर कर्ज फेडल्यानंतर (Loan Prepayment) पण पेनेल्टी द्यावी लागते. ही दंडाची रक्कम व्याजाच्या रक्कमे इतकी पण असू शकते. त्यामुळे प्रत्येकवेळी घाई बरोबरच असते, असे नाही. ही घाईगडबड खिसा सुद्धा खाली करु शकते.

कर्ज घेतानाच या गोष्टी निश्चित

बँका कर्ज मंजूर करतात. तेव्हाच कर्ज किती दिवसांसाठी देण्यात येत आहे, हे निश्चित असते. कर्जदाराला हे कर्ज किती दिवसात चुकते करायचे आहे आणि त्यावर किती व्याजदर आकारण्यात येईल, हे स्पष्ट असते. त्याआधारे EMI चे गणित तयार होते. त्याची परत फेड करावी लागते.

काय आहे प्रीपेमेंट पेनेल्टी?

पण तुम्ही कर्ज फेडण्याच्या निश्चित कालावधीपूर्वीच कर्ज फेडत असाल तर बँकेला व्याजातून होणारा फायदा मिळत नाही. हे बँकेचे नुकसान असते. हे नुकसान भरुन काढण्यासाठी बँका प्रीपेमेंट पेनेल्टी लावतात. त्यामुळे त्यांना कर्जाऐवजी निश्चित व्याजाचा मोबदला मिळतो. अर्थात सर्वच वित्तीय संस्था, बँका असा दंड लावतातच, असे नाही.

पण वाचतो कोण?

या दंडाविषयी बँका कर्ज घेण्याविषयीच्या अर्जात माहिती देतात. त्यात अटी आणि शर्तींचे जवळपास एक अथवा अधिक पानं असतात. त्याकडे शक्यतोवर अनेक ग्राहक दुर्लक्ष करतात. या अटी आणि शर्तीत लवकर कर्ज फेडल्यास किती दंड आकारण्यात येईल, त्याची माहिती असते. काही वित्तीय संस्था, बँका त्यासाठी निश्चित दंड तर काही टक्क्यांआधारे दंड घेतात. त्यामुळे अटी आणि शर्ती अगोदर वाचा. बँकेच्या अधिकाऱ्याकडून याविषयीची खात्रीशीर माहिती करुन घ्या.

कसे वाचणार या खेळीतून

  1. जर अटी आणि शर्तीत दंडाचा उल्लेख नसेल तर कर्ज लवकर फेडण्यात काहीच नुकसान नाही. तुम्ही झटपट कर्ज फेडू सकता. त्यामुळे व्याजदराच्या झंझटीतून तुम्ही मुक्त होता.
  2. प्रीपेमेंट पेनेल्टी असेल तर कर्ज फेडण्यापूर्वी याविषयीचे गणित मांडा. यामध्ये काही सवलत मिळत असले तर ते पाहा. तसेच किती अतिरिक्त रक्कम जमा केल्यास आणि किती वेळा ही रक्कम जमा केल्यास दंड लागत नाही याची माहिती घ्या.
  3. तुम्ही दंडाची रक्कम कमी करण्याविषयी बँक, वित्तीय संस्थेकडे विचारणा करु शकता. पण लवकर परतफेड करताना दंडाची रक्कम अधिक असल्यास काहीच फायदा होणार नाही. हा एक प्रकारे फटकाच असले. हे नुकसान सहन करण्यात काहीच अर्थ नसतो.
  4. जर लवकर परतफेड करुनही उपयोग होत नसले, त्यातून मोठा काही फायदा होत नसेल तर कर्जाची रक्कम तुम्ही ठरलेल्या कालावधीतच भरा. तुमचे फार नुकसान होत नसेल तर बचत तुम्ही म्युच्युअल फंड अथवा मुदत ठेवीत गुंतवा, त्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.