बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये फसवणूक झाल्यास काय करावे? जाणून घ्या तक्रार करण्याची प्रक्रिया

पोस्ट ऑफिसमध्ये यापूर्वी कोणताही महत्त्वाचा आणि विशेष मार्ग नव्हता, परंतु आता या तक्रारीसाठी स्वतंत्र चॅनेल बनविण्यात आले आहे, जेणेकरून काही समस्या असल्यास आपण तक्रार करू शकता. (What to do in case of fraud in post office like bank, know the process of reporting)

बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये फसवणूक झाल्यास काय करावे? जाणून घ्या तक्रार करण्याची प्रक्रिया
बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये फसवणूक झाल्यास काय करावे?
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 3:30 PM

नवी दिल्ली : आजकाल लोक आपले पैसे बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेत आहेत. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना बँकेपेक्षा चांगले उत्पन्न मिळत आहे, त्यामुळे बरेच लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करीत आहेत. पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये ग्राहकांची संख्या वाढत असताना, पोस्ट ऑफिसमध्येही फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येत आहेत, जसे बँकेत फसवणूक होते. बँकेतील वाढत्या फसवणुकीमुळे बँकांकडून बरीच महत्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत आणि फसवणूक संबंधित तक्रारींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. (What to do in case of fraud in post office like bank, know the process of reporting)

तुम्हाला बँकेच्या यंत्रणेबद्दल खूप चांगले माहिती असेलच, परंतु पोस्ट ऑफिस योजनेत फसवणूक झाल्यास तुम्हाला काय करावे लागेल हे आपल्याला माहिती आहे का? वास्तविक, पोस्ट ऑफिसमध्ये यापूर्वी कोणताही महत्त्वाचा आणि विशेष मार्ग नव्हता, परंतु आता या तक्रारीसाठी स्वतंत्र चॅनेल बनविण्यात आले आहे, जेणेकरून काही समस्या असल्यास आपण तक्रार करू शकता. अशा परिस्थितीत, फसवणूक संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्ट ऑफिसने काय व्यवस्था केली आहे.

बचत योजनांमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या विल्हेवाट लावण्यासाठी नुकताच पेस्ट ऑफिसने एसओपी जारी केला होता. यापूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये फसवणुकीचा दावा करण्यासाठी कोणतीही प्रमाणित प्रक्रिया नव्हती. तथापि, आता बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये तक्रार करता येईल.

तक्रार कशी करायची?

पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाऊन दावा दाखल करू शकते. या व्यतिरिक्त ग्राहक ईमेल, स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टच्या माध्यमातून तक्रारी पाठवू शकतात. परंतु, ज्याप्रमाणे बँकेत कोणताही घोटाळा झाल्यानंतर तीन दिवसांत तक्रार करावी लागते, तसा पोस्ट ऑफिसमध्ये कोणताही विशेष नियम आणि वेळ मर्यादा नाही.

काय आहे तक्रार प्रक्रिया?

– यासाठी, आपल्याला प्रथम क्लेम फॉर्म भरावा लागेल, जो पोस्ट विभागाने जारी केला आहे. किसान विकास पत्र, एनएससी, मनी ऑर्डर इत्यादी संबंधित तक्रारी या फॉर्मद्वारे करता येतील.

– या फॉर्मसह, आपल्याला फोटो आयडी आणि पत्ता आयडी देखील द्यावा लागेल. यासह, या आयडीला सेल्फ अटेस्टेड करणे देखील आवश्यक असेल.

– तक्रार अर्जासोबत पासबुक, प्रमाणपत्र, ठेवीची पावतीही द्यावी लागेल. तसेच, जर आपण एखाद्या दाव्यासाठी पोस्ट ऑफिसला जात असाल तर तुम्हाला मूळ कागदपत्रही तुमच्या बरोबर घ्यावा लागतील, ज्याची पडताळणी पोस्ट ऑफिसमध्ये करावी लागेल.

– यानंतर तक्रार दिल्यानंतर त्यावर 7 दिवसांत कार्यवाही करणे आवश्यक असून प्रभाग अधिकाऱ्यास दहा दिवसांत त्याविषयी माहिती द्यावी लागते. (What to do in case of fraud in post office like bank, know the process of reporting)

इतर बातम्या

Cinema Censorship | फरहान अख्तर, अनुराग कश्यपसह 1400 कलाकार सेन्सॉरशिप कायद्याच्या विरोधात, दाखल केली याचिका!

राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार, तिन्ही पक्षांची हिच भूमिका: नवाब मलिक

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.