AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Insurance : बास्स की! Breakup चं किती उगळाल दुःख, हा विमा घालेल की प्रेमाची फुंकर

Love Insurance : जमाना चिक्कार बदललाय ना भाऊ, मग प्रेमाला बदलाचे वावडे कसे असेल, नाही का? जर तुम्हाला साथीदाराकडून प्रेमात धोका मिळाला तर नुकसान भरपाई मिळू शकते. डोकं चक्रावला ना...

Love Insurance : बास्स की! Breakup चं किती उगळाल दुःख, हा विमा घालेल की प्रेमाची फुंकर
Heartbreak
| Updated on: Apr 15, 2023 | 7:45 PM
Share

नवी दिल्ली : हृदय विमा, आरोग्य विमा, जीवन विमा, कार विमा, गृह विमा ही यादी आता लांबलचक वाढली आहे. कोरोना काळानंतर तर अनेक विमा कंपन्या(Insurance Companies) नाविन्यपूर्ण विमा योजना बाजारात आणत आहेत. पण तुम्ही कधी प्रेमाचा विमा(Love Insurance) , हा शब्द ऐकला आहे का? तुम्ही म्हणाल, काय राव, असा कुठं विमा असतो का? हो, असा विमा बाजारात आला आहे. जमाना चिक्कार बदललाय ना भाऊ, मग प्रेमाला बदलाचे वावडे कसे असेल, नाही का? जर तुम्हाला साथीदाराकडून प्रेमात धोका मिळाला तर नुकसान भरपाई मिळू शकते. तेव्हा नाजूक नातेसंबंधात अडचण आल्यास आता टेन्शन घेऊ नका, पैशांनी प्रेमाची किंमत करता येत नसली तरी जगण्यासाठी पैसा लागतोच की, नाही का?

कधी मिळतो विमा अर्थात प्रेमभंग झाल्यावर विमा तुमच्या दुःखावर प्रेमाची फुंकर घालणार आहे. ही बाबच अनोखी आहे. इन्स्टंट प्रेमाच्या या जमान्यात प्रेम कितपत टिकेल याची शाश्वती दोन्ही पार्टीच देऊ शकते. या दोन्ही व्यक्तीत जर खटके उडाले तर ते वेगळे होऊ शकतात. अर्थात असे होऊ नये. पण झालंच तर , त्यांना प्रेमाचा विमा मदत करु शकतो. प्रेमात साथीदाराने धोका दिला, तो सोडून गेला. भांडण झालं आणि ब्रेकअप झालं तर हा विमा तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे.

हार्ट ब्रेक इन्शुरन्स जग झपाट्याने बदलत आहे. पण नाते घट्ट होत आहे. पण प्रत्येकवेळी, प्रत्येक व्यक्तीला सारखाच अनुभव येईल असे नाही. सोशल मीडियाच्या या जमान्यात झट की पट प्रेम होते आणि रात्रीतूनच ब्रेकअप पण होते. अशावेळी प्रेमाचा विमा मदतीला धावून येईल. हार्ट ब्रेक इन्शुरन्समुळे धोका मिळालेल्या पार्टनरला आर्थिक सहाय मिळते.

काय आहे हार्टब्रेक फंड सोशल मीडियावरील भेटीनंतर एका मुलाने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने हार्ट ब्रेक फंडात दर महिन्याला काही रक्कम जमा केली. काही महिन्यानंतर त्यांना नाते टिकविणे जड गेले. या फंडातील अटीनुसार, ज्याने विश्वासघात केला. जो साथीदार सोडून गेला, त्याची रक्कम विम्यासहीत त्याच्या पार्टनरला देण्यात येते.

मुलाला मिळाले 25 हजार या प्रकरणातील प्रेमवीरांनी काही ठराविक रक्कम दरमहा या हार्टब्रेक फंडात जमा केली. ही रक्कम दरमहा 500 रुपये जमा करत होते. दोघांचे मिळून या फंडात एक हजार रुपये जमा झाले. काही महिन्यानंतर या नात्यातून मुलगी बाहेर पडली. तिने प्रियकराला धोका दिला, असे गृहीत धरुन विमा कंपनीने गुंतवणूक विम्यासहीत नुकसान भरपाई म्हणून परत केली. मुलाला 25 हजार रुपये मिळाले.

या कंपन्या देतात विमा सॅफरन अथवा Pioneer या विमा कंपन्या इश्कवाला लव्हला विम्याचे संरक्षण देतात. म्हणजे दोघांनी या विमा पॉलिसीअतंर्गत ठराविक रक्कम जमा करणे आवश्यक असते. जर प्रेमात धोका मिळाला तर त्या व्यक्तीला प्रेमाचा विमा मिळतो. सॅफरन MONA म्हणजेच Move On NA या नावाने हा प्रेमाचा विमा मिळतो. तुम्ही या कंपन्यांच्या संकेत स्थळावरुन सविस्तर माहिती मिळवू शकता.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...