लहान मुलांसाठी आधार कार्ड का आहे महत्त्वाचे?, कितव्या वर्षी होते अपडेट जाणून घ्या

साधारनपणे 18 वर्षांवरील व्यक्तीजवळ ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड , वाहन चालवण्याचा परवाना असे विविध ओळखपत्र असतात. परंतु लहान मुलांकडे वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत यातील एकही ओळखपत्र नसते. त्यामुळे त्याला ओळखीच्या पुराव्यासाठी केवळ आधार कार्डवर अवलंबून राहावे लागते.

लहान मुलांसाठी आधार कार्ड का आहे महत्त्वाचे?, कितव्या वर्षी  होते अपडेट जाणून घ्या
AAdhar-Card
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 11:48 AM

नवी दिल्ली :  आजच्या युगामध्ये आधार कार्ड (Aadhaar card) हे तुमच्याकडे असलेले सर्वात महत्त्वपूर्ण  ओळखपत्र (ID card) आहे. इतर कोणत्याही डॉक्युमेंटपेक्षा जसे की मतदान कार्ड (Election cardवाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट (Passport) या सर्वांपेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आधार कार्डची गरज अधिक भासते. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक ठरते. आज सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेला तुमचे आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे. त्यावरूनच तुमची ओळख पटवून, तुम्हाला संबंधित योजनेचा लाभ दिला जातो. आधार कार्ड हे केवळ प्रौढ व्यक्तीसाठीच नाही तर लहान मुलांसाठी देखील आवश्यक आहे. आधार कार्डचे महत्त्व पाहाता आता देशात नवजात बालकांचे देखील आधार कार्ड बनवण्यात येते. 

लहान मुलांसाठी आधार कार्ड का गरजेचे?

साधारनपणे 18 वर्षांवरील व्यक्तीजवळ ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड , वाहन चालवण्याचा परवाना असे विविध ओळखपत्र असतात. परंतु लहान मुलांकडे वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत यातील एकही ओळखपत्र नसते. त्यामुळे त्याला ओळखीच्या पुराव्यासाठी केवळ आधार कार्डवर अवलंबून राहावे लागते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेत प्रवेश घेण्यासाठी देखील आधारची गरज असते. सरकारकडून लहान मुलांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधारची गरज असते.

आधार कार्ड केव्हा अपडेट करावे?

एक दिवसाच्या बालकांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमॅट्रिक डिटेलची आवशकता नसते. मात्र जेव्हा बालक पाच वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते, तेव्हा त्याचे आधारकार्ड बनवण्यासाठी बायोमॅट्रिक डिटेलची आवशकता असते. जेव्हा आपले आपत्य 15 वर्षांचे होते, तेव्हा पुन्हा एकदा त्याचे आधार कार्ड अपडेट करावे लागते. अशाप्रकारे वयाच्या 5 व्या वर्षी आणि 15 व्या वर्षी असे दोनदा आधार कार्ड अपडेट करावे लागते. आज प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आवशकता असल्याने आपल्या मुलांचे आधार कार्ड तयार करणे गरजेचे झाले आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.