Kalyan | कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, महिला सुरक्षेचा प्रश्न  पुन्हा ऐरणीवर

Kalyan | कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

| Updated on: May 17, 2026 | 4:09 PM

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सौरभ सोनवणे याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अहिल्यानगर येथून कल्याणमध्ये आली होती. याचदरम्यान आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपी आणि पीडित मुलगी यांच्यात पूर्वीपासून ओळख होती का, याचाही शोध घेतला जात आहे.

Published on: May 17, 2026 04:09 PM
Follow Us