काय घडतयं तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या राज्यात पहा नव्या अपडेटसह 36 जिल्हे 72 बातम्या

काय घडतयं तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या राज्यात पहा नव्या अपडेटसह 36 जिल्हे 72 बातम्या

| Updated on: Oct 15, 2022 | 6:20 PM

एकीकडे अंधेरी पोटनिवडणुकीवर राज्याचे लक्ष लागले असतानाच आता चंद्रपूरमध्ये ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. चंद्रपूरमध्ये 88 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे.

कोल्हापूरात स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत मंजूर झाले 13 ठराव. या ठरावांसह ऊसाला एकरक्कमी एफआरपी सह 300 रूपये जादा दर देण्याची मागणी करण्यात आली आहेत. तर याच ऊस परिषदेत वजनकाटे देखिल ऑनलाईन करण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. तर सांगलीत आरटीओ अधिकाऱ्याचा लाच मागितल्या प्रकरणी निषेध करण्यात आला. तर लाच मागितल्या प्रकरणी एका सामाजिक कार्यकरत्याने आपले कपडे त्या अधिकाऱ्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे अंधेरी पोटनिवडणुकीवर राज्याचे लक्ष लागले असतानाच आता चंद्रपूरमध्ये ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. चंद्रपूरमध्ये 88 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. तर शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्रवेश मुदतवाढीचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर पुण्यात 33 हजारांहून अधिक प्रवेशाच्या जागा रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पुण्यातील वाहधारकांसाठी सध्यातरी आनंदाची बातमी आली आहे. पुण्यातील CNG पंपधारकांनी पुकारलेला संप हा पुढे ढकलला आहे. आता हा संप 1 नोव्हेंबरपासून होईल.

 

Published on: Oct 15, 2022 06:20 PM