4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 14 December 2021

| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 3:52 PM

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाजपकडून वारंवार तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तर मार्चमध्येच ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे. परंतु, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही, असं विधान केलं आहे.

राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरे सरकार पडणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर तिघांचं सरकार पाहता हे सरकार पडेल असं वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच महाविकास आघाडीचे घोटाळे मी काढणार नाही, असंही राज यांनी सांगितलं.