अभिजीत दीपकेला खरंच भाजपमधून ऑफर? बोलता बोलता भाजप प्रवक्ते हे काय म्हणाले?
भाजपमध्ये प्रवेशासाठी धमक्या दिल्याचा गंभीर आरोप अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यांनी सांगितले की, "त्यांच्या (भाजपच्या) किती ऑफर आल्या आहेत मला. पण मी भाजपमध्ये जाणार नाही. मला जर भाजपमध्ये जायचं असतं तर मी आधीच गेलो असतो. मला धमक्या आल्या होत्या की बीजेपीमध्ये सामील झाला तर बरं आहे नाही तर आंदोलन मागे घ्या. नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही. गोळ्या घालू."
भाजपमध्ये प्रवेशासाठी धमक्या दिल्याचा गंभीर आरोप अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यांनी सांगितले की, “त्यांच्या (भाजपच्या) किती ऑफर आल्या आहेत मला. पण मी भाजपमध्ये जाणार नाही. मला जर भाजपमध्ये जायचं असतं तर मी आधीच गेलो असतो. मला धमक्या आल्या होत्या की बीजेपीमध्ये सामील झाला तर बरं आहे नाही तर आंदोलन मागे घ्या. नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही. गोळ्या घालू.”
या आरोपांवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया देत सर्व दावे फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले की, भाजपमध्ये प्रवेशासाठी कोणालाही धमक्या देण्याची गरज नसते. तसेच, “हे पूर्णपणे खोटं आहे की भाजपमध्ये प्रवेश करायचा म्हणून धमक्या दिल्या गेल्या,” असे त्यांनी स्पष्ट केले.
उपाध्ये यांनी पुढे सांगितले की, आंदोलनामुळे प्रसिद्धी मिळाली म्हणून कोणालाही कोणतेही आरोप करण्याचा अधिकार मिळत नाही. तसेच, भाजपकडून प्रवेशासाठी ऑफर देण्यात आल्याचा दावा करणाऱ्यांनी त्याबाबत ठोस माहिती द्यायला हवी पुरावे द्यावेत, असेही त्यांनी नमूद केले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
